(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai : यंदाही मुंबईची तुंबई होणार? नालेसफाईचं काम केवळ 35-40 टक्केच, आशिष शेलारांचा आरोप
BJP Leader Ashish Shelar on BMC : पालिकेत गेली 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. मात्र मुंबईत पाणी साठल्याचं दिसून येतं. यावरून विरोधी पक्षाने शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे.
BJP Leader Ashish Shelar on BMC : आज एबीपी माझावर दिवसभर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर या 'प्रश्न महाराष्ट्राचे' या विशेष कार्यक्रमात एबीपी माझा संबंधित राजकीय नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील प्रश्न विचारले आहेत. यावेळी भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासोबत खास बातचीत करण्यात आली. यादरम्यान आशिष शेलार यांनी आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालिकेची 25 वर्ष सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळते. पालिकेकडून दरवर्षी आश्वासन मिळतात, मात्र पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी भरल्याचं दिसून येतं. पालिकेत गेली 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. मात्र मुंबईत पाणी साठल्याचं दिसून येतं. यावरून विरोधी पक्षाने शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे.
शिवसेनेकडे मुंबई पालिकेची 25 वर्ष सत्ता असूनही मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबते. नालेसफाईचा होत नाही. 25 वर्षात स्वत:च्या पक्षाची पोती भरण्याचं काम शिवसेनेनं केलं, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत केवळ 35 ते 40 टक्के नाले सफाई झाली आहे. अडीच हजार कोटीचा निधी मिठी निधीत गेला. मिठी नदीत कचऱ्याची बेटं तयार झाली आहे. गजदर पंपिंग स्टेशनच्या मुखावर आणि तीन नाले एकत्र येण्याचा प्रवाहाच्या समोर दगडांचा ढीग जमा झाला आहे. यातून पावसाळ्यात पाण्याचा निचरा कसा होईल, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे. इतकी वर्ष सत्ता असूनही मुंबईकरांचे प्रश्न सुटलेले नाहीत, यासाठी शिवसेनेनं मुंबईकरांची माफी मागायला हवी, असं शेलार यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेवर निशाणा साधत शेलार यांनी सांगितलं आहे की, एप्रिलपर्यंत पालिकेने नालेसफाईचं कंत्राटही दिलं नव्हतं. भाजपनं नालेसफाईचा मुद्दा उचलल्यानंतर पालिकेनं पाऊल उचलली. भाजपने नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. आयुक्तांना फोटोसहित अहवाल दिला. महाविकास आघाडीने नालेसफाईच्या कामाची पाहणी केली नाही. मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी भाजपनं वेळोवेळी पाठपुरावा केला. दोन वेळा भाजपनं नालेसफाई पाहणी करत अहवाल मांडला. यानंतर आता भाजप तिसऱ्यांदा नालेसफाईच्या कामाची पाहणी करुन आयुक्तांकडे अहवाल देईल, असंही आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Ashish Shelar : बाळासाहेबांच्या नेतृत्त्वावर आमचा विश्वास होता, नव्या नेतृत्त्वावर नाही : आशिष शेलार
- दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार? शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडूंनी सांगितली 'ही' तारीख
- Prashna Maharashtrache : शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध झाले पाहिजे, दादाजी भुसे यांच्या सूचना
- Sambhajiraje Chhatrapati : राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार, म्हणाले, हा माझा स्वाभिमान