एक्स्प्लोर

छोटा पॅकेट बडा धमाका! 8 महिन्यांपूर्वी पैसे गुंतवणारे आज कोट्यधीश, 'या' कंपनीनं दिले तब्बल 1400 टक्के रिटर्न्स!

या कंपनीने गेल्या काही महिन्यांपासून चांगली कामगिरी केली आहे. या कंपनीत गुंतवणाऱ्यांना आठ महिन्यांत चांगले रिटर्न्स मिळाले आहेत.

मुंबई : मागील आर्थिक वर्ष आयपीओच्या दृष्टीने चांगलेच सकारात्मक राहिले.  या काळात प्रारंभिक समभाग विक्रीच्या (IPO) माध्यमातून कंपन्यांनी तसेच गुंतवणूकदारांनीही बऱ्यापैकी पैसे कमवले. काही कंपन्यांचे आयपीओ तर असे आहेत, जे गुंतवणूकदारांना समाधानकारक रिटर्न्स देणार का? असे विचारले जात होते. मात्र या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना तगडे रिटर्न्स दिले आहेत. यामध्ये बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड (Bondada Engineering Ltd.) या कंपनीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. या कंपनीने आयपीओ आल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1400 टक्के रिटर्न्स दिले आहेत. 

तब्बल 1400 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स

बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध झाल्यापासून त्याने चांगली कामगिरी केली आहे. या कंपनीत आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांनी चांगला पैसा कमवला आहे. आयपीओपासून फक्त आठ महिन्यांत या शेअरने तब्बल 1400 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत.   

चालू आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (12 एप्रिल) या कंपनीचे शेअर्स चांगलेच वर जात होते. सुरुवातीच्या सत्रात या कंपनीचा शेअर 1,190 रुपयांपर्यंत गेला होता. आता त्याचे मूल्य 1161 रुपये आहे. या शेअरचे  52 आठवड्यांतील ऑल टाईम हाय मूल्य हे 1,191.75 रुपये आहे. 

मल्टिबॅगर ठरला शेअर 

गेल्या पाच दिवसांपासून बोंदाडा इंजिनिअरिंगच्या शेअरचा आलेख चढा आहे. याच पाच दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत. म्हणजेच तीन महिन्यांत हा शेअर मल्टिबॅगर ठरलाय. 

50 कोटींचा होता आयपीओ 

या कंपनीने गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात आपला आयपीओ आणला होता. हा आयपीओ 42.72 कोटी रुपयांचा होता. सुरुवातीला या कंपनीने आपल्या एका शेअरची किंमत 75 रुपये ठेवली होती. आज याच शेअरची किंमत 1,191 रुपयांपर्यंत गेली आहे. तुलनाच करायची झाल्यास आयपीओ आल्यापासून या कंपनीच्या शेअर्सने 1,486 टक्के रिटर्न्स दिले आहेत. 18 ऑगस्ट 2023 रोजी हा आयपीओल लॉन्च झाला होता.  

गुतवणूकदारांना बम्पर रिटर्न्स 

बोंदाडा इंजिनिअरिंगच्या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये 1600 शेअर होते. म्हणजेच या कंपनीच्या आयपीओत गुंतवणूक करायची असल्यास गुंतवणूकदारांकडे कमीत कमी 1 लाख 20 हजार रुपये असणं गरजेचं होतं. आताच्या बाजारमूल्यानुसार गणित करायचं झाल्यास याच एका लॉटचे मूल्य आता 19 लाख 4 हजार रुपये झाले आहे. म्हणजेच आठ महिन्यांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने बोंदाडा इंजिनिअरिंगच्या आयपीओमध्ये पाच लाखांची गुंतवणूक केली असती, तर आज त्या शेअर्सचे मूल्य हो कोट्यवधी रुपये असते. आज तोच गुंतवणूकदार थेट कोट्यशीश झाला असता. 

(टीप- या लेखाचा फक्त माहिती देण्याचा उद्देश आहे. हा लेख म्हणजे गुंतवणुकीचा सल्ला समजू नये. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

हे ही वाचा :

रतन टाटांनी लग्न केलं नाही, पण मागे मोठा परिवार; कोट्यवधींचं साम्राज्य सांभाळणाऱ्या 'या' सदस्यांविषयी जाणून घ्या!

आधी 12 आता थेट 214 रुपये! 'या' कंपनीच्या शेअरची कमाल, पैसे गुंतवल्यास व्हाल मालामाल!

चार वर्षांत एका लाखाचे झालेत तब्बल 45 लाख, छप्परफाड रिटर्न्स देणाऱ्या 'या' कंपनीविषयी माहिती आहे का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget