एक्स्प्लोर

निवडणूक संपताच महागाई वाढणार? 'या' एका कारणामुळे खिशाला बसणार मोठी झळ!

लोकसभेच्या निवडणुकीचा येत्या 4 जून रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीतनंतर बऱ्याच धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ते बदल काय असतील याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

मुंबई : सध्या निवडणुकीचा हंगाम आहे. सगळे राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. आम्ही सत्तेत आल्यास महागाई कमी (Inflation) करू. कमी पैशांत सोई-सुविधा देऊ, अशी आश्वासनं या पक्षांकडून दिली जात आहेत. मात्र हीच निवडणूक संपल्यावर देशातल्या सामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणूक संपल्यानंतर आपल्या जीवनात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मोबाईलचे रिचार्ज महागण्याची शक्यता आहे. आगामी काही महिन्यांत देशातील दूरसंचार कंपन्या (Telecom Company) लवकरच आपल्या मोबाईल टॅरिफ प्लॅन्समध्ये (Mobile Tariff Plans) वाढ करणार आहेत, असे सांगितले जात आहे. तसे झाल्यास निवडणूक संपताच सामान्यांच्या खिशाला झळ बसू शकते.

 अॅनालिस्ट अँटिक स्टॉक ब्रोकिंग कंपनीचा मोठा दावा 

आज मोबाईल हा जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. मोबाईल नसेल तर दिवसभरातील अनेक कामे खोळंबून जातात. 5 जी इंटरनेट आल्यापासून तर मोबाईलवरील अवलंबित्व जास्तच वाढलं आहे. मात्र याच इंटरनेट पुरवणाऱ्या दूरसंचार कंपन्या लवकरच आपले मोबाईल टॅरिफ प्लॅन्स वाढवण्याची शक्यता आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तसा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आता मोबाईल वापरणे महागडे ठरण्याची शक्यता आहे. पीटीआयने अॅनालिस्ट अँटिक स्टॉक ब्रोकिंग या संस्थेच्या हवाल्याने तसे वृत्त दिले आहे.  अँटिक स्टॉक ब्रोकिंग या संस्थेच्या म्हणण्यानुसार जिओ आणि एअरटेल यासारख्या प्रमुख दूरसंचार कंपन्या 2024 सालची लोकसभा निवडणूक संपताच आपले मोबाईल रिचार्च प्लॅन्स आणखी महाग करण्याची शक्यता आहे. हे प्लॅन्स सध्याच्या तुलनेत साधारण 15 ते 17 टक्के वाढण्याची शक्यता आहे. 

या संभाव्य वाढीबाबत दूरसंचार कंपन्यांनी सध्याच काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या या आगामी धोरणाची शक्यता वर्तवली जात आहे. पण तसे होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.

4  जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल 

दरम्यान सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. येत्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 1 जून रोजी होईल. 4 जून रोजी या लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येईल. त्यानंतर सत्तेत कोण येणार हे स्पष्ट होईल. देशात नव्या सरकारची स्थापना झाल्यास अनेक धोरणांवर वेगळे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार, हे स्पष्ट होईल.

हेही वाचा :

रतन टाटांनी लग्न केलं नाही, पण मागे मोठा परिवार; कोट्यवधींचं साम्राज्य सांभाळणाऱ्या 'या' सदस्यांविषयी जाणून घ्या!

आधी 12 आता थेट 214 रुपये! 'या' कंपनीच्या शेअरची कमाल, पैसे गुंतवल्यास व्हाल मालामाल!

चार वर्षांत एका लाखाचे झालेत तब्बल 45 लाख, छप्परफाड रिटर्न्स देणाऱ्या 'या' कंपनीविषयी माहिती आहे का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget