(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधी 12 आता थेट 214 रुपये! 'या' कंपनीच्या शेअरची कमाल, पैसे गुंतवल्यास व्हाल मालामाल!
Man Infra या कंपनीने गेल्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आगामी काळातही या कंपनीच्या समभागाचे मूल्य आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई : शेअर बाजारात (Share Market) अशा काही कंपन्या असतात ज्या फार चर्चेत नसतात खऱ्या, पण याच कंपन्यांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिलेला असतो. यात मॅन इन्फ्रास्ट्रकच्र लिमिटेड (Man Infra) या कंपनीचा समावेश आहे. सध्या या कंपनीच्या समभागाचे मूल्य 214.90 रुपये असून ती आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा शेअर 270 रुपयांपर्यंत भरारी घेऊ शकतो.
मूल्य 28 टक्के वाढू शकते.
ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्योरिटीजच्या म्हणण्यानुसार मॅन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचे शेअर्स आगामी काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच या कंपनीचे समभाग खरेदी करण्याचा सल्ला दिला जातोय. एक्सिस सिक्योरिटीजनुसार या कंपनीचे शेअर 270 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच सध्या शेअरच्या किमतीच्या तुलनेत आगामी काळात हा शेअर 28 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
चार वर्षांत शेअर 1600 टक्क्यांनी वाढला!
मॅन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने गेल्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आकड्यांत सांगायचे झाल्यास गेल्या चार वर्षांत या कंपनीच्या समभागांचे मूल्य तब्बल 1600 टक्क्यांनी वाढले आहे. मॅन इन्प्फ्राच्या शेअरचे मूल्य 9 एप्रिल 2020 रोजी 12.43 रुपये होते. 12 एप्रिल 2024 रोजी या शेअरचे मूल्य 218.70 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षभरापासून या शेअरचे मूल्य साधारण 180 टक्क्यांनी वाढले आहे. 12 एप्रिल 2023 रोजी या शेअरचे मूल्य 77.71 रुपये होते वर्षभरानंतर म्हणजेच 12 अप्रैल 2024 रोजी या कंपनीचा शेअर 218.70 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
(टीप- हा फक्त माहितीपर लेख आहे. आम्ही कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्याची शिफारस करत नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
घरात पाळीव प्राणी असल्यास मिळणार भरघोस सुट्ट्या, आता कर्मचाऱ्यांची मज्जाच मज्जा!
टाटा घराण्यातील 'ही' तीन नावे माहीत आहेत का? लाईमलाईटपासून दूर, पण सांभाळतायत कोट्यवधींचे उद्योग!
'या' कंपनीचं एक पाऊल पुढे! लवकरच येणार 10 हजार कोटींचा IPO, खोऱ्याने पैसे ओढण्याची संधी!