(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुकेश अंबानी पुन्हा बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, श्रीमंतांच्या यादीत अदानी 9व्या स्थानावर घसरले
Forbes Real Time Billionaires Index: देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे.
Forbes Real Time Billionaires Index: देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. शुक्रवारी सकाळी अदानी पुन्हा आशियातील अब्जाधीश नंबर वन बनले होते, पण दुपारपर्यंत मुकेश अंबानींच्या संपत्तीत $6.5 बिलियनची वाढ झाली आणि ते पुन्हा सहाव्या स्थानावर पोहोचले.
फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, शुक्रवारी दुपारी 1:30 वाजेपर्यंत, अंबानी $ 104.7 अब्ज संपत्तीसह जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. दुसरीकडे, सकाळी सहाव्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी आता $99.7 अब्ज संपत्तीसह नवव्या क्रमांकावर घसरले आहेत. आता आठव्या क्रमांकावर असलेल्या लॅरी एलिसन आणि सातव्या स्थानावर असलेले लॅरी पेज हे त्यांच्या पुढे आहेत.
फोर्ब्स रिअल टाईम अब्जाधीश निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीनुसार शुक्रवारी सकाळपर्यंत, अदानीची एकूण संपत्ती $102.5 अब्ज होती आणि ते पुन्हा सहाव्या क्रमांकावर पोहोचले होते. तर अंबानी 101.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 7 व्या स्थानावर होते. यातच इलॉन मस्क $ 233.7 अब्ज संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहे. बर्नार्ड अरनॉल्ट 157.0 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस आहेत, ज्यांची एकूण संपत्ती $151.2 अब्ज आहे. बिल गेट्स 129.1 अब्ज डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
- EPFO Update : तुमच्या पीएफवरील व्याजदर ठरला, ईपीएफओनं तोंडाला पानं पुसली, 40 वर्षातील सर्वात कमी Interest Rate
- पत्नीच्या नावाने NPS खाते उघडा: 5 हजारांची गुंतवणूक अन् एक कोटींपेक्षा जास्त परतावा, 44 हजार महिना पेन्शनचाही लाभ
- निष्काळजीपणामुळे शेअर ट्रेडिंग दरम्यान 'त्याने' एका क्लिकवर 250 कोटी रुपये गमावले
- Share Market Opening : भारतीय शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 540 अंकांनी वधारला
- OPEC On Crude Oil : इंधन दरवाढीतून दिलासा मिळणार? ओपेक देशांनी घेतला महत्त्वाचा निर्णय