search
×

पत्नीच्या नावाने NPS खाते उघडा: 5 हजारांची गुंतवणूक अन् एक कोटींपेक्षा जास्त परतावा, 44 हजार महिना पेन्शनचाही लाभ

National Pension Scheme : एनपीएस खात्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दरमहा किती पेन्शन हवे आहे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. वयाच्या 60 व्या वर्षी पत्नीला पैशाची कमतरता भासणार नाही.

FOLLOW US: 
Share:

National Pension Scheme : भविष्यात, जर तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला पैशासाठी अवलंबून राहायचे नसेल. तर तुम्ही तिच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. यासाठी नवीन पेन्शन सिस्टम (NPS) खाते पत्नीच्या नावाने उघडता येते. एनपीएस खाते पत्नीला वयाच्या 60 व्या वर्षी एकरकमी रक्कम देईल. याशिवाय दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे. हे पत्नीचे नियमित उत्पन्न असेल. एनपीएस खात्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दरमहा किती पेन्शन हवे आहे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. वयाच्या 60 व्या वर्षी पत्नीला पैशाची कमतरता भासणार नाही.

पत्नीच्या नावाने एनपीएस खाते उघडा - 
तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर नवीन पेन्शन प्रणाली (राष्ट्रीय पेन्शन योजना) खाते उघडू शकता. सोयीनुसार दरमहा किंवा वार्षिक पैसे जमा करण्याचा पर्याय आहे. एनपीएस खाते पत्नीच्या नावाने 1,000 रुपयांनीही उघडता येते. खाते वयाच्या ६० व्या वर्षी परिपक्व होते. नवीन नियमांनुसार, तुम्हाला हवे असल्यास, पत्नीचे वय 65 वर्षे होईपर्यंत एनपीएस खाते चालू ठेवू शकता.

₹5000 मासिक गुंतवणुकीसह ₹1.14 कोटी निधी मिळेल - 
उदाहरणार्थ, तुमची पत्नी 30 वर्षांची आहे आणि तुम्ही तिच्या एनपीएस खात्यात दरमहा 5000 रुपये गुंतवले. जर त्यांना वार्षिक गुंतवणुकीवर 10 टक्के परतावा मिळाला, तर वयाच्या 60 व्या वर्षी त्यांच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये असतील. यातून त्यांना सुमारे ४५ लाख रुपये मिळतील. याशिवाय त्यांना दरमहा सुमारे ४५ हजार रुपये पेन्शन मिळू लागेल. हे पेन्शन त्यांना आयुष्यभर मिळत राहील.

तुम्हाला एकरकमी रक्कम किती मिळेल आणि किती पेन्शन मिळेल

तुम्हाला किती पेन्शन मिळेल?
वय- 30 वर्षे
गुंतवणुकीचा एकूण कालावधी- 30 वर्षे
मासिक योगदान- 5,000 रु
गुंतवणुकीवर अंदाजे परतावा- 10 टक्के
एकूण पेन्शन फंड- मॅच्युरिटीवर 1,11,98,471 रुपये 
वार्षिकी योजना खरेदी करण्यासाठी 44,79,388 रक्कम.
रु. 67,19,083 अंदाजे वार्षिक दर 8%
मासिक पेन्शन- 44,793 रु.

राष्ट्रीय पेन्शन योजना ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. तुम्ही या योजनेत गुंतवलेले पैसे व्यावसायिक फंड मॅनेजरद्वारे व्यवस्थापित केले जातात. केंद्र सरकार या व्यावसायिक निधी व्यवस्थापकांना ही जबाबदारी देतो. अशा परिस्थितीत तुमची एनपीएसमधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या पैशावर परतावा मिळण्याची खात्री नाही. वित्तीय नियोजकांच्या मते, एनपीएसने सुरुवातीपासून सरासरी 10 ते 11 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

Published at : 03 Jun 2022 06:42 PM (IST) Tags: pension NPS

आणखी महत्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

टॉप न्यूज़

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप

Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप

Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक

Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली