EPFO Update : तुमच्या पीएफवरील व्याजदर ठरला, ईपीएफओनं तोंडाला पानं पुसली, 40 वर्षातील सर्वात कमी Interest Rate
EPFO Interest Rate Date : 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी व्याजाचा दर 8.1 टक्के ठरवण्यात आलाय. ही रक्कम गतवर्षीपेक्षा 0.4 टक्केंनी कमी आहे.
EPFO Interest Rate Date : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे... कारण तुमच्या ईपीएफ खात्यात 2021-22 या आर्थिक वर्षातील व्याजाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) म्हणजेच ईपीएफओनं यासंदर्भात एक पत्रक जारी केलेय. त्यानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी व्याजदर 8.1 टक्के ठरवण्यात आलाय. ही रक्कम गतवर्षीपेक्षा 0.4 टक्केंनी कमी आहे. गतवर्षी 8.5 टक्के व्याज मिळत होते. 2021-22 साठी जाहीर करण्यात आलेली 8.1 टक्के व्याजदर मागील 40 वर्षातील सर्वात कमी आहे. दरम्यान, ईपीएफओ (EPFO Interest Rate) लवकरात लवकर व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न करत असेल.
2020-21 मध्ये 8.5 टक्के व्याज -
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी आणि कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) यांनी फायनान्स इन्वेस्टमेंट आणि ऑडिट कमिटीसोबत चर्चा करुन 2020-21 वर्षासाठी 8.50 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला होता. ईपीएफओ खात्यात जमा रकमेच्या 15 टक्के इक्विटीमध्ये तर बाकी रक्कम Debt मध्य जमा होते.
कधी किती व्याजदर मिळाला?
FY14 आणि FY15 में ब्याज दर 8.75%
FY16 मध्ये व्याज दर 8.80 %
FY 17 मध्ये व्याज दर 8.65 %
FY18 मध्ये व्याज दर 8.55 %
FY19 मध्ये व्याज दर 8.65 %
FY20 मध्ये व्याज दर 8.5 %
FY 21 मध्ये व्याज दर 8.5 %
FY 22 मध्ये व्याज दर 8.1 %
Govt approves 8.1 pc rate of interest on employee provident fund deposits for 2021-22: EPFO office order
— Press Trust of India (@PTI_News) June 3, 2022
ईपीएफओचा मोठा निर्णय -
व्याज दर कमी होऊ नये आणि कोट्यवधी ईपीएफओ युजर्सला चांगला व्याजदर मिळावा (EPFO Interest Rate) त्यासाठी EPFO ने इक्विटी गुंतवणूकीची मर्यादा 15 टक्केंनी वाढवून 25 टक्के करण्याच्या विचारात आहे. EPFO च्या या निर्णायाचा भविष्यात कोट्यवधी युजर्सला मोठा फायदा होऊ शकतो. सध्या ईपीएफओ खात्यात जमा रकमेच्या 15 टक्के इक्विटीमध्ये तर बाकी रक्कम Debt मध्य जमा होते. पण आता ही मर्यादा 25 टक्के करण्याचा विचार ईपीएफओ विचार करत आहे.