एक्स्प्लोर
निष्काळजीपणामुळे शेअर ट्रेडिंग दरम्यान 'त्याने' एका क्लिकवर 250 कोटी रुपये गमावले
Stock Market: कधी कधी एक छोटीशी चूक किती भारी असू शकते याची कल्पनाही करणं कठीण असतं. अशीच एक घटना गुरुवारी एनएसईवर ट्रेडिंग दरम्यान समोर आली.
Stock Market: कधी कधी एक छोटीशी चूक किती भारी असू शकते याची कल्पनाही करणं कठीण असतं. अशीच एक घटना गुरुवारी एनएसईवर ट्रेडिंग दरम्यान समोर आली. जेव्हा ब्रोकरच्या चुकीच्या क्लिकमुळे सुमारे 250 कोटी रुपयांचे नुकसान झाले. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसारित केलं आहे.
ब्रोकरेजच्या भाषेत, याला 'फॅट फिंगर ट्रेडिंग' म्हणतात, जिथे ब्रोकर ऑर्डर देताना चुकून की-बोर्डवरील असे बटण दाबतो ज्यामुळे त्याचा संपूर्ण व्यवहार नष्ट होतो. भारतातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रकरण आहे. यामध्ये दलालांचे 200 ते 250 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यापूर्वी 2012 मध्ये ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबललाही अशाच एका प्रकरणात 60 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
ही चूक कधी आणि कशी झाली
ही चूक कधी आणि कशी झाली
गुरुवारी दुपारी 2.37 ते 2.39 दरम्यान, निफ्टीवर ऑप्शन ट्रेडिंगच्या वेळी एका ब्रोकरने 25 हजार लॉटसाठी बोली लावली. यावेळी प्रत्येक लॉटची बाजारातील किंमत सुमारे 2,100 रुपये होती, परंतु ब्रोकरने चुकून खूपच कमी किंमत सांगितली. ऑर्डर देताच ब्रोकरला 200-250 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही बाजार विश्लेषकांचा दावा आहे की ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत 250 कोटींपेक्षा कमी नाही.
एकीकडे ऑर्डर देणाऱ्या ब्रोकरला एवढा मोठा तोटा सहन करावा लागला, तर दुसरीकडे याच घटनेमुळे कोलकात्यातील दोन दलालांना करोडोंचा फायदा झाला. बाजार विश्लेषकांच्या मते, एका ब्रोकरने सुमारे 50 कोटींचा थेट नफा कमावला आहे, तर दुसऱ्याला 25 कोटींचा फायदा झाला आहे.
विम्याद्वारे संरक्षित केले जाईल

एनएसईकडून या घटनेबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नसले तरी एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रकरण दोन ब्रोकर्समध्ये घडले असल्याने आणि चुकून एकाला नुकसान सोसावे लागले, तर आधीच केलेल्या विम्याद्वारे त्याची भरपाई केली जाईल. तांत्रिक अडथळ्यांना टाळून अशा चुकीच्या ट्रेडिंग ऑर्डर्सची अंमलबजावणी कशी झाली, याचा एक्स्चेंज तपास घेत आहे.
खरं तर, 2012 मध्ये, जेव्हा फॅट फिंगर ट्रेडिंगचा मुद्दा पहिल्यांदा समोर आला तेव्हा सर्व ब्रोकरेज हाऊसेसने असे तंत्र विकसित केले होते ज्यामध्ये अशा चुकीच्या ट्रेड ऑर्डर ओळखल्या गेल्या आणि स्वतःला नष्ट केले. एनएसईनेही असे तंत्र विकसित केले होते ज्यामध्ये बाजारभावापेक्षा कमी ऑर्डर दिल्यास ते ओळखले जाईल. पण, या प्रकरणातही एनएसईचे हे तंत्र कामी आले नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement