एक्स्प्लोर

WhatsApp Ban Solution : व्हॉट्सअप बॅन झालंय? ‘अशी’ मिळवा सुटका, समजून घ्या कारणं!

व्हॉट्सअपवर (whatsApp) ढीगभर लिंक्स फॉरवर्ड रिल्स पाहिल्याशिवाय, एकमेकांना लिंका, फोटो, मिम्स, खबरी, सुविचार, फॅमिली ग्रुपवरती शुभेच्छांचा पाऊस पडल्या शिवाय अनेकांचा दिवसच सरत नाही. हेच काय तर आपल्या ऑफिसचं काम असो किंवा छोटेमोठे 
व्यवसाय करणारी मंडळी आज WA वरती फार अवलंबून राहते. अशातच जर तुमचं पर्सनल कामाचं व्हॉट्सअपच बंद पडलं तर आणि तुम्हाला अचानकपणे 'This Account is not allowed to use whatsapp' असा मेसेज डिस्प्ले झाला, तर मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते.

माझं व्हॉट्सअप अचानक बॅन झालं, जे 24 तास रिव्ह्यूसाठी बंद केलं होतं. मात्र अधिक माहिती घेतल्यावर लक्षात आलं की काहींचं कायमस्वरूपी, काहींचं दोन ते तीन तर काहींचं सहा महिन्या साठी बंद केलं जाऊ शकतं.  

सांगायची लिहायची गोष्ट अशी की, आपण ज्या क्षेत्रात काम करतो किंवा काहींना आवड म्हणून किंवा एखाद्या व्हॉट्सअपचं ठराविक फिचर वापरण्याची आवड असते, किंवा त्यांच्या तो कामाचा भाग असतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक महागात पडतो अगदी तसंच सगळी सोशल माध्यमं अलीकडे नवनवीन Terms And Conditions/Community Guidelines घेऊन येत आहेत. त्यामागे नक्कीच हेतू चांगलाच आहे मात्र याचा आपल्याला अचानकपणे त्रास होऊ शकतो.

व्हॉट्सअप बॅन होण्याची कारणं कोणती?

सोप्पंय, ज्या ज्या सेवा, फिचर्स व्हॉट्सअप देतं त्याचा गैरवापर करणं, हे झालं प्रमुख कारण मात्र एखादी ऍक्टिव्हिटी गैर आहे की नाही हे कसं ठरवणार? तर...
 
1. तुम्ही ओळखीतल्या किंवा अनोळखी लोकांच्या नंबरवर संदेश/मेसेज पाठवले असतील.
2. तुम्हाला मिळालेल्या मेसेजपेक्षा तुम्ही जास्त मेसेज पाठवले असतील.
3. व्हॉट्सअप ग्रुप चॅनेलवर परवानगीशिवाय संपर्क जोडणे.
4. एखादा मेसेज एकापेक्षा अधिक लोकांना कॉपी आणि पेस्ट केला, तोच अनेकांना  फॉरवर्ड केला. 

यासोबतच आपण मेसेजिंग करताना किंवा चॅटिंग करताना, बातम्या, आर्टिकल्सच्या न्यूज लिंक शेरिंग. व्हायरल रिल्सच्या  लिंक फॉरवर्ड, शेरिंग करणं नियमबाह्य आहे.

तुम्ही व्हॉट्सअप वापरताना एखादी ऍक्टिव्हिटी सलग सारखी-सारखी करत असाल, व्हॉट्सअप फेसबुकला कनेक्ट करत असाल, मोबाईलमध्ये सिम नाही तरी वेब किंवा वेगवेगळ्या डिव्हाईसवर अकाऊंट चालवत असाल तर या समस्यांना तोंड द्यावे लागेल. तुमचंही अकाउंट माझ्यासारखं बंद होऊ शकतं.  

अशी काही बेसिक कारणं यामागे आहेत मात्र अधिक विस्तृत माहिती पुढील लिंकवर मिळेल.
https://www.whatsapp.com/legal/terms-of-service

तुमचा खोळंबा होऊ नये यासाठी, WhatsApp च्या सेवाशर्ती वाचून तसं ते वापरावं. अगदी हीच गोष्ट इतर सोशल मीडियाची माध्यमं वापरताना त्या त्या माध्यमांच्या सेवाशर्ती वाचायला हव्यात. कंपन्यांनी बिजनेस अकाउंट वापरावे, कोणत्याही संस्था त्यांच्या कारभारासाठी व्हॉट्सअपचा वापर करत असतील तर ते यूजर्स आणि संस्थांच्या सुरक्षेसाठी धोक्याचं आहे.

व्हॉट्सअप बॅन झालं तर काय करावं?

1. सर्वात आधी अकाऊंट बॅन झाल्यावर घाबरून न जाता, दीर्घ श्वास घ्यावा. घाई गडबडीत पुन्हा पुन्हा लॉग इन करू नये, व्हॉट्सअप सुरु करण्यासाठी उगाच धडपड करू नये.  
2. जे मेसेज डिस्प्ले होत आहेत, त्यानुसार ते वाचून पुढील पावलं उचलावीत.
3. व्हॉट्सअपच्या Help center ( https://faq.whatsapp.com/ ) या लिंकवर जाऊन सर्वात खाली Contact us येथे जाऊन आपली तक्रार नोंदवावी.
4. अकाउंट बॅन झालेले असल्यास Grievance Officer सोबत मेलद्वारे संपर्क साधावा. आपली योग्य तक्रार करावी.
5. Two factor authentication कायम सुरु ठेवावे.
6. Recovery ऑप्शन्ससाठी ईमेल, दुसरा मोबाईल नंबर देऊन ठेवावा.  

अकाउंट रिकव्हर होईपर्यंत, थोडासा ब्रेक घेतल्यास हरकत नाही! तेवढाच वेळ Digital detox म्हणल्याप्रमाणे शांतात मिळेल मात्र तुमचं महत्वाचं काम अडकून पडणार असेल तर मात्र तुमची झोप उडायची शक्यता आहे.  

विनीत वैद्य यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग 

'X' फॅक्टर...
मृत्यूस कारण की...
पैश्याच सोंग...
दोन दगडांवर पाय...
झेपावे मिलियन्सकडे...
डिजिटल डिस्टन्स

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Embed widget