एक्स्प्लोर

जिभेचे चोचले :  चवदार मिल्कशेक्सचा ब्रॅण्ड : ‘केवेंटर्स’

‘केवेंटर्स’ हा देशाच्या राजधानीत जन्मलेला आणि रुजलेला ब्रॅण्ड साधारणत: 95 वर्षे जुना आहे. अमूल, मदर डेअरी यासारखा ‘केवेंटर्स’ हा डेअरी प्रॉडक्टसचा अतिशय लोकप्रिय ब्रॅण्ड आहे. पंतप्रधानांपासून सर्व मंत्र्यांची घरं ज्या भागात आहेत, त्या भागात ‘केवेंटर्स’चं आईस्क्रीम फार फेमस होतं.

बाहेरचं खाणं म्हणजे दरवेळी काहीतरी पोटभर खायचं, असा काही नियम नसतो. केवळ चव बदल म्हणून किंवा रिफ्रेशमेंट म्हणूनही काही वेळेला विविध प्रकारचे पदार्थ आपण खातो; किंवा खाण्यापेक्षाही चाखतो म्हणूयात. दिवसभरात काहीवेळा असंही वाटतं की, भूक तर लागलीय; पण काही खायला नको. उलट काहीतरी गारेगार प्यायला हवं. अशावेळी अगदी सहजपणे उपलब्ध होणारा पर्याय असतो तो म्हणजे शितपेयांचा. पण हा पर्याय ना घसा गार करण्यासाठी उपयोगी पडतो, ना खऱ्या अर्थाने क्षुधातृप्ती होते.  म्हणून आजकाल अगदी तरुणाईलाही मिल्कशेक्स, थिकशेक्स यांची जास्त भूरळ पडत आहे. गेल्या काही वर्षात मिल्कशेक्सच्या चवींमध्ये आणि त्याच्या पद्धतींमध्ये इतकी क्रांती झाली आहे. कारण, अशा चवींचा किंवा अशा मिल्कशेक्सचा काही वर्षांपूर्वी आपण विचारही करु शकलो नसतो. मॉडर्न स्नॅक्सचे वेगवेगळे पर्याय आणि त्याच्या जोडीला असे भल्यामोठ्या ग्लासमधले बिस्कीटं, चॉकलेट्स, फळं आणि आईस्क्रीम अशा सगळ्या गोड पदार्थांचा भरणा असलेले शेक्स असा मोजका मेन्यू सर्व्ह करणारे कितीतरी मॉडर्न कॅफेज किंवा छोटे रेस्टॉरन्टस् सगळीकडे निघाले आहेत. तिथे गेल्यावर खाद्यपदार्थांबरोबर ही मिल्कशेक्सही चाखणं अगदी आवश्यक असतं. पण तरीही केवळ मिल्कशेक्स बाकी काहीच नाही अशी दुकानं हा विचार जरा धाडसीच म्हणावा लागेल. keventers परदेशातला हा ट्रेण्ड आणि तिथले मिल्कशेकचे प्रसिद्ध ब्रॅण्डस, गेल्या काही वर्षात भारतात आलेत. नुसतेच आले नाही तर स्थिरावले आणि लोकप्रियही झाले आहेत. सध्या ‘केवेंटर्स’ नावाचा असाच एक मिल्कशेकचा ब्रॅण्ड सध्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व वयाच्या लोकांना भूरळ घालतो आहे. किंबहुना नुसती भुरळच नाही तर चटक लावतो आहे. सध्या मुंबईत ‘केवेंटर्स’चे 20 तरी आऊटलेटस निघाले आहेत. bottles बरं हे काही रेस्टॉरन्ट नाही किंवा हा कॅफेही नाही. तसंच अगदी तिथे उभं राहून मिल्कशेक प्यायचं असलं तरी ‘केवेंटर्स’मध्ये बाटलीला झाकण लावूनच ती बाटली आपल्या हातात दिली जाते. त्यामुळे मुंबईतले सगळे ‘केवेंटर्स’चे आऊटलेट एका छोट्याशा गाळ्यात निघालेले आहेत. या ‘केवेंटर्स’च्या मिल्कशेकची त्याच्या चवीबरोबरच आणखी एक खासियत म्हणजे, एका वैशिष्ट्यपूर्ण काचेच्या बाटलीत मिळणारं मिल्कशेक. आणि या बाटलीची गंमत म्हणजे ती जुन्या काळी सरकारी डेअरीचं दूध ज्या बाटलीत मिळायचं, तशीच ही बाटली दिसते. ही काचेची बाटली झाकणासकट आपल्याला दिली जाते, आणि ती बाटली थेट घरी न्यायची असते. सुंदर आकार आणि दिसायला आकर्षक म्हणून आजकाल काचेच्या ग्लासला पर्याय म्हणून आपण आजकाल अशा बाटल्या घरच्यासाठी विकत घेत असतो. पण इथे मात्र घरच्या सगळ्यांनी एक एक मिल्कशेक प्यायलं की, थेट अशा बाटल्यांचा सेट तयार होतो. त्यामुळे घरच्या गृहिणींनाही हे मिल्कशेक चांगलंच भावतं आहे. तसंच प्लॅस्टीकचा वापर नसल्यानं ही बाटली पर्यावरणपूरकही ठरते. जिभेचे चोचले :  चवदार मिल्कशेक्सचा ब्रॅण्ड : ‘केवेंटर्स’ मिल्कशेक्सचे अगदी वर्षानुवर्ष आवडणाऱ्या मँगोशेक, स्ट्रॉबेरी शेक, कोल्ड कॉफीपासून थेट मॉडर्न फ्लेवर्सपर्यंत सगळे इथे मिळतात. ट्रुटी-फ्रूटी फ्लेवरचा मिल्कशेक, किटकॅट चॉकलेट घालून केलेलं मिल्कशेक, ओरिओ बिस्कीटाचा मिल्कशेक असे कितीतरी प्रकार मिल्कशेकचे मिळतात. हे सगळे मिल्कशेक ज्या बाटल्यांमध्ये मिळतात, त्या बाटल्याही छोटी आणि मोठी अशा दोन आकारात मिळतात. त्यामुळे दुसरं काहीही न खाता केवळ मोठ्या बाटलीतला मिल्कशेक रिचवूनही एकवेळची भूक नक्की भागवता येते. मिल्कशेकचे असे विविध प्रकार एकाचवेळी बघायचे, तर या ‘केवेंटर्स’ नावाच्या कुठल्यातरी दुकानात जायलाच हवं. शिवाय, मिल्कशेक म्हणजे ते गारच असणार हाही आपला (गैर) समज इथे येऊन संपतो. कारण, ‘केवेंटर्स’मध्ये वॉर्म शेक्स म्हणजे कोमट शेक्स असाही एक सेक्शन यांच्या मेन्यूकार्डात दिसतो. अर्थात हे वॉर्म मिल्कशेक्स आईस्क्रीमच्याच साथीनं सर्व्ह होतात. कुठलाही शेक मागवला की, आपल्या डोळ्यांसमोरच ताजी फळं वापरुन तो तयार केला जातो. आणि काचेच्या बाटलीत भरुन त्या बाटलीचं झाकणं लावूनच आपल्या हातात दिलं जातं. त्यामुळे तो मिल्कशेक ताजाच असतो, हे वेगळं सांगायलाच नको. हा ताजेपणा, चव आणि मिल्कशेक सर्व्ह करण्याची युनिक पद्धत यामुळे केवेंटर्स मुंबईकरांमध्ये चांगलंच गाजतं आहे. जिभेचे चोचले :  चवदार मिल्कशेक्सचा ब्रॅण्ड : ‘केवेंटर्स’ अर्थात ‘केवेंटर्स’ या नावावरुन हा ‘कॅफे कॉफी डे’ किंवा ‘स्टारबक्स’सारखा फॉरेनचा भारतात दाखल झालेला ब्रॅण्ड आहे का? असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतो. पण असा विचार करणाऱ्यांसाठी या ब्रॅण्डचा इतिहास खूपच रंजक वाटेल. ‘केवेंटर्स’ हा देशाच्या राजधानीत जन्मलेला आणि रुजलेला ब्रॅण्ड साधारणत: 95 वर्षे जुना आहे. अमूल, मदर डेअरी यासारखा ‘केवेंटर्स’ हा डेअरी प्रॉडक्टसचा अतिशय लोकप्रिय ब्रॅण्ड आहे. पंतप्रधानांपासून सर्व मंत्र्यांची घरं ज्या भागात आहेत, त्या भागात ‘केवेंटर्स’चं आईस्क्रीम फार फेमस होतं. छोट्या-छोट्या आईस्क्रीमच्या गाड्यांवर हे आर्ईस्क्रीम मिळायचं आणि त्यातही त्यांचं कसाटा आईस्क्रीम फार प्रसिद्ध होतं. जिभेचे चोचले :  चवदार मिल्कशेक्सचा ब्रॅण्ड : ‘केवेंटर्स’ पण काळाच्या ओघात आईस्क्रीमचे इतर ब्रॅण्ड राजधानीत दाखल झाले, आणि दिल्लीतला हा जुना ब्रॅण्ड मागे पडला. आता केवेंटर्स हे नाव संपलं किंवा इतिहासजमा झालं असं वाटत असतानाच, काही वर्षापूर्वी याला पुनरुज्जिवीत करण्यात आलं ते या मिल्कशेक्सच्या चेनच्या रुपात. दिल्लीत अगदी थोड्या कालावधीत लोकप्रियतेचे उच्चांक मोडल्यानंतर अगदी गेल्या काही महिन्यात मिल्कशेक्स मुंबईत मिळू लागली आहेत. आणि इथल्या कुठल्याही कानोपऱ्यातल्या मुंबईकराला मिल्कशेक्स चाखता यावीत, अशा पद्धतीनं ही आऊटलेट्स उभारली आहेत. वांद्रयाचा कार्टर रोडचा भाग, पवई, घाटकोपर, चेंबूर, ठाण्याला हिरानंदानी इस्टेटचा भाग, कांदिवली अशी सगळ्या भागात आपल्याला ही मिल्कशेक्स मिळतात. अर्थात या बाटलीतल्या मिल्कशेकच्या किमती मात्र चढ्याच आहेत. अगदी छोट्या बाटलीतला मिल्कशेकही किमान 99 रुपयाला मिळतो. बाकी स्पेशल मिल्कशेक तर 125 रुपये आणि मोठी बाटली 200 रुपयांना मिळते. त्यामुळे हा मिल्कशेक कॉलेजला जाणाऱ्य़ा तरुणाईच्या पसंतीस उतरला असला, तरी त्यांच्या दृष्टीने पॉकेट फ्रेंडली नक्कीच नाही. अर्थात नेहमी नाही, तरी अधुनमधून ट्राय करायला एक चांगला पर्याय नक्कीच निर्माण झाला आहे. संबंधित ब्लॉग जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो... जिभेचे चोचले : द अमेरिकन जॉईंट जिभेचे चोचले : आजीच्या पोतडीतील पदार्थांसाठी 'ग्रॅण्डमामाज् कॅफे' जिभेचे चोचले : खवय्यांचं लाडकं लिजेंडरी स्टेटस  जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे जिभेचे चोचले - सीएसटीपेक्षाही जुनं पंचम पुरीवाला जिभेचे चोचले : फ्रेंच फ्राईजसाठी  – ‘द जे’ जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29 जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
Embed widget