CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य

CSK vs KKR IPL 2025: काल झालेल्या कोलकाता विरुद्ध चेन्नई सामन्यात चेन्नई संघाने विजय मिळवून कोलकाता संघाची पार्टी खराब करण्याचे काम केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने दमदार सुरुवात केली..गुरबाझ बाद झाल्यावर अजिंक्य आणि नारायण यांनी ३४ चेंडूत ५८ धावांची भागीदारी करून कोलकाता आज मोठी धावसंख्या उभारेल असे संकेत दिले...पण नारायण बाद झाल्यावर कोलकाता संघाचा धावांचा वेग मंदावला...नारायण नूर याच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना यष्टीचीत झाला...त्याच्याकडे क्रिझ मध्ये परतण्यातही भरपूर वेळ होता..पण आपल्याला क्रीझ मध्ये परतायचे आहे हेच बहुधा तो विसरला...आणि मागे धोनी असल्यावर चूक व्हायची शक्यता नव्हती...स्पर्धेत सातत्य पूर्ण कामगिरी करणारा रघुवंशी आज अपयशी ठरला ...यष्टीचा मागे धोनी ने त्याचा सुरेख झेल घेतला.
या स्पर्धेत अजिंक्य सुरुवात उत्तम करीत असून सुद्धा मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरत आहे....त्याने आज आक्रमक खेळ केला...कुठे सुद्धा तो बाद होईल असे वाटत नव्हते...त्याने मारलेले षटकार देखणे असतात तसे ते आज ही होते...आज अजिंक्य रहाणे याला फक्त तोच बाद करू शकतो असे वाटत होते. ..आणि झाले ही तसेच....त्याच्या ४८ धावा असताना त्याने जडेजा विरुद्ध रिव्हर्स स्वीप करताना त्याचा प्रयत्न फसला आणि तो बाद झाला... रिव्हर्स स्वीप हा आपला फटका नाही हे अजिंक्य याला माहित आहे...पण मोह ..खरे तर तो ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू तो ऑन साइडवर कुठे ही खेळू शकला असता...त्याच्या नंतर रसेल आणि मनीष पांडे यांनी ४६ धावांची भागीदारी करून संघाला १७९ धावांचा पल्ला गाठून दिला...आज रिंकू सिंग याचा आयुष याने डीप स्क्वेअर लेग वर अप्रतिम झेल घेतला...आणि नूर याने घेतलेल्या ४ बळी मुळे कोलकाता संघ २०० पार करू शकला नाही...
१८० धावांचा पाठलाग करताना चेन्नई संघ पॉवर प्ले मधेच कोसळला..चेन्नई संघाने पॉवर प्ले मधेच पाच बळी गमावले...आयुष वैभव अरोरा याला बॅकफूट वर ड्राईव्ह करताना कव्हर मध्ये सापडला...आणि मोईन याच्या एका अप्रतिम चेंडूवर कॉन्वे त्रिफळाचित झाला..आज चेन्नई संघाचे सलमीचे फलंदाज भोपळा ही फोडू शकले नाहीत...पण चेन्नई संघाने संधी दिलेला उरिविल पटेल याने ११ चेंडूत ४ षटकारांसहीत ३१ धावांची खेळी करून आपले पदार्पण केले...त्याने आज मोईन याला मारलेल्या स्लॉग स्वीप पाहून तो या फॉरमॅट मध्ये मोठा फलंदाज होऊ शकतो हे दर्शविते....हा सामना दहाव्या षटकापर्यंत कोलकाता संघाचा होता...पण अकरावे षटक घेऊन आलेल्या वैभव अरोरा याच्या त्या षटकात ब्रेव्हिस याने ३० धावा काढून सामना चेन्नई संघाचा बनविला....या षटकाची सुरुवात नाट्यमय झाली...पहिल्याच चेंडूवर रघुवंशी याने लाँग ऑफ सीमारेषेवर ब्रेविस याचा झेल सोडला...आणि मग बेबी एबीडी याने खोखर एबीडी सारखी फलंदाजी करून ६ चेंडूत ३० धावा करून आपले अर्धशतक साजरे केले...त्याचा सोडलेला एक झेल कोलकाता संघाला या स्पर्धेबाहेर घेऊन गेला...तो बाद झाल्यावर शिवम आणि धोनी या दोघांनी ४५ धावांची भागीदारी करून चेन्नई आज विजयी होईल हे पाहिले... शेवटच्या षटकात ८ धावा हव्या असताना पहिल्याच चेंडूवर धोनी ने षटकार ठोकून सामना चेन्नई संघाचा केला...चेन्नई संघ आधीच स्पर्धेबाहेर गेला आहे..काल त्यांनी आपल्या सोबत कोलकाता संघाला देखील घेतले.

























