MI vs RR IPL 2025: महाराष्ट्रदिनी राजधानी मुंबई अव्वल

MI vs RR IPL 2025: १९९९ च्या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला होता..त्यात ऑस्ट्रेलिया संघाचा विजय झाला होतां.सामना संपल्यावर ग्लेन मॅग्रा याला त्याच्या कामगिरी बद्दल विचारले तेव्हा तो म्हणाले होता...की भारताचा श्रीनाथ जेव्हा गोलंदाजी करीत होता तेव्हा तो वेगवान आखूड टप्प्याचे चेंडू टाकून फलंदाजांस चकवीत होता..तेव्हा मला समजले की फलंदाज चेंडू वर चकले की गोलंदाजाला बरे वाटते पण त्याने बळी मिळत नाहीत... मग मी चेंडूचा टप्पा पुढे केला आणि मला बळी मिळाले. हे सर्व आठवण्याचे कारण कालचा मुंबई विरुद्ध राजस्थान सामना...राजस्थान संघाच्या एकही फलंदाजाने रोहित आणि रिकलटन यांच्याकडून काहीही बोध घेतला नाही. ..कदाचित त्यांच्या डोक्यात त्यांनी गुजरातवर मिळालेल्या विजयाची हवा असेल.
आयपीएल सारख्या मोठ्या आणि कौशल्याच्या स्पर्धेत तुम्ही प्रतिस्पर्धी संघाकडून शिकायचे असते .. राजस्थानच्या फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याऐवजी छोट्या भागीदारीवर जर भर दिला असता तर कदाचित ते यशस्वीरित्या पाठलाग करू शकले असते... कारण मैदानाच्या सीमारेषा आणि मैदानातील वातावरण तुम्हाला मोठे फटके खेळण्याची परवानगी देत नव्हते. सुरवातीला फलंदाजी करीत असताना रोहित शर्मा आणि रिक्लटन याने मोठी भागीदारी केली..त्यात दोघांनी मिळून ११६ धावांची सलामी दिली..नेहमी रोहित शर्मा पॉवर प्ले मध्ये षटकारांची बरसात करतो..पण काल त्याने केवळ गॅप मध्ये चेंडू खेळण्यावर भर दिला...त्याने अर्धशतक पूर्ण केले ( त्यात रिव्ह्यू मुळे मिळालेले जीवदान होते)पण त्यात ९ चौकार होते आणि एक सुद्धा षटकार नव्हता...असे क्वचित घडते...त्याने मैदानाची सीमारेषेचा अंदाज घेतला...मैदानातील वातावरण पाहून कोणताही धोका न पत्करता शतकी भागीदारी केली..यात रिक्लटन ने ३८ चेंडूत ६१ धावा केल्या. .रिक्लटन याची फलंदाजी पहिली की त्याच्यावर मुंबई संघ व्यवस्थापन इतका विश्वास का टाकते हे समजून येते..ऑन साइड च्या फटाक्यांवर त्याची किती हुकमत आहे हे त्याने मारलेल्या षटकार पाहून समजून येते..रिकल्टन याचा स्ट्राईक रेट १६० तर रोहित याचा १४७ इतका होता..या दोघांनी रचलेल्या पायावर शेवटी सूर्यकुमार आणि हार्दिक यांनी कळस चढविला..दोघांनी २३ चेंडूचा सामना करून ४८ धावा केल्या..दोघांच्या भात्यात काही खास फटके आहेत त्याचा वापर दोघांनी फार सावधतेने केला..सूर्यकुमार याचा आवडीचा स्वीप आणि ऑफ स्टम्प बाहेरील चेंडू डीप फाइन वर मारण्याचे कसब पाहिले की वाटते हा एबिडी पेक्षा थोडा सरस आहे..हार्दिक बॅकफूट वर जाऊन जेव्हा चेंडू कव्हर मधे मारतो तेव्हा क्षेत्ररक्षक जागचे हलत सुद्धा नाहीत इतकी ताकद त्याच्या फटक्यात असते. त्याच प्रकारे एक फटका तो ऑन साइड ला मारतो जो काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट मधून सीमापार जातो...मुंबई संघाने आज फक्त ७ षटकार मारले आणि तरी देखील त्यांच्या धावा २१७ झाल्या यावरून त्यांची डावाची आखणी दिसून येते....
मुंबई संघाकडून काहीच न शिकलेले राजस्थानचे फलंदाज आप आपली विकेट मुंबई संघाला बहाल करीत गेले... ट्रेंट बोल्ट च्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून यशस्वी ने आक्रमक सुरुवात केली....पण त्यानंतर बोल्ट शहाणा झाला आणि त्याने लेंथ थोडी मागे करून यशस्वी चा त्रिफळा उडविला... त्या आधी दुसऱ्याच चेंडूवर वैभव मोठा फटका खेळताना मीड ऑन वर बाद झाला....दोन बळी गेल्यावर ज्या षटकात १४ धावा आल्या आहेत त्याच षटकात राणा षटकार मारताना बाद झाला. त्यानंतर पराग कडून खूप अपेक्षा होत्या पण एका चेंडूवर चौकार मिळाल्यावर बुमरहा ला तसाच फटका खेळताना बाद झाला. ..नंतर आलेल्या हेट मायर साठी बॅकवर्ड शॉर्ट लेग आणि शॉर्ट मीड विकेट लावून पुल च्या सापळ्यात त्याला अडकविला ...पॉवर प्ले मध्ये ५ बळी गेल्यावर २१७ धावा गाठणे म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर शिवाय एवरेस्ट चढण्यासारखे होते...राजस्थान संघाचा डाव ११७ धावा काढून आटोपला...सलग ६ सामने जिंकून मुंबई संघ गुणतालिकेत आघाडीवर गेला.. मुबई संघ प्ले ऑफ मध्ये पोहोचणे म्हणजे विजेतेपदाची संधी त्यांना देण्यासारखे आहे. ..पुढील ३ सामन्यात मुंबई संघ २ सामने जिंकून प्ले ऑफ मधील आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करेल...
स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना प्ले ऑफ ची लढत चुरशीची झाली आहे...मुंबई ने आज जयपूर मध्ये विजयाचा षटकार मारून एक पाऊल पुढे टाकले...गुजरात ,दिल्ली.यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.२०१२ नंतर आलेला जयपूर मधील हा विजय मुंबईच्या सहाव्या विजेतपदाची नांदी ठरू शकेल.

























