एक्स्प्लोर

जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे

ठाण्याच्या एव्हरीडे अंडेमध्ये ऑम्लेटचेच किती प्रकार मिळतात..आपण नेहमी खातो ते कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून केलेलं एक ऑम्लेट ज्याला मसाला ऑम्लेट, ब्रोकोली, रंगीत शिमला मिर्च्या अशा विदेशी भाज्या टाकून केलेलं एका प्रकारचं ऑम्लेट, चिकन क्युब्स टाकलेलं चिकन ऑम्लेट, पालक आणि मशरुम असलेलं एकदम हेल्दी ऑम्लेट आणि मुंबईकरांच्या लाडक्या वडापावच्या स्टाईलमध्ये सर्व्ह होणारं मुंबय्या ऑम्लेट

सर्वात पौष्टीक पदार्थ म्हणून अंडी खाणारी किंवा मुळातच अंडे का फंडा आवडणाऱ्या एगीटेरियन लोकांचा आकडा भरपूर असतो...आम्ही व्हेज आहोत पण अंडी खातो असं म्हणणारी जनताही भरपूर आणि नॉनव्हेज खूप आवडतं पण अंडीही आवडतात असं अभिमानाने सांगणारी मंडळीही भरपूर...या आवडीमुळेच अंड्यापासून नवनवीन पदार्थ शोधून काढण्याकडे फक्त हॉटेलचे शेफ्सच नाहीत तर आपल्या घरोघरच्या गृहशेफ्सचा कल असतो...अंडा भुर्जी, ऑम्लेटचे वेगवेगळे प्रकार, अंडाकरी यापेक्षाही वेगळ्या पद्धतीनं अंडी खायची असतील तर मात्र स्पेशल जागाच गाठावी लागते..गेल्या काही वर्षात अशा अंडीप्रेमी किंवा एगलव्हर्ससाठी केवळ आणि केवळ अंड्याचे विविध पदार्थ सर्व्ह करणारी रेस्टॉरन्ट जवळपास सगळ्याच शहरामंध्ये निघालीत.. जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे दिवसाच्या सगळ्याच वेळांना पण त्यातही सकाळच्या वेळात ही रेस्टॉरन्टस जबरदस्त चालतात..कारण अंड्याचा कुठला तरी प्रकार कितीतरी जणांचा आवडता ब्रेकफास्ट असतो..त्या ब्रेकफास्टमधली किंवा ब्रेकफास्टच कशाला अगदी लंच आणि डिनरमध्येही अंड्याचे नवनवीन प्रकार चाखायचे तर अशा खास अंड्याच्या रेस्टॉरन्टमध्ये जायलाच हवं...पुण्यात कोथरुडला योल्कशायर नावाचं असंच अंड्याचं रेस्टॉरन्ट आहे आणि सगळ्या वयाच्या अंडाप्रेमींची तिथे कायम गर्दी असते..बोरीवलीत ‘एगलिशियस’ नावाची अशीच एक अंडीप्रेमींसाठीची जागा आहे, तर ठाण्यात ‘एव्हरीडे अंडे’ नावाचं अंड्याचे पदार्थ देणारं रेस्टॉरन्ट आहे.. अशा प्रत्येक रेस्टॉरन्टमध्ये त्यांचा असा वेगळा मेन्यू असतो...त्या त्या शेफच्या कल्पनेतून तयार झालेले अंड्याचे चवदार पदार्थ खायला खवय्यांच्या अक्षरश: रांगा असतात अशा अंड्याच्या स्पेशालिटी रेस्टॉरन्टमध्ये. जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे अंडी म्हंटली की पहिल्यांदा अड्यांचा हमखास आठवणारा पदार्थ म्हणजे सगळ्यांचं लाडकं, तयार करायलाही सोप्पं असलेलं ऑम्लेट.  ठाण्याच्या एव्हरीडे अंडेमध्ये ऑम्लेटचेच किती प्रकार मिळतात..आपण नेहमी खातो ते कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून केलेलं एक ऑम्लेट ज्याला मसाला ऑम्लेट, ब्रोकोली, रंगीत शिमला मिर्च्या अशा विदेशी भाज्या टाकून केलेलं एका प्रकारचं ऑम्लेट, चिकन क्युब्स टाकलेलं चिकन ऑम्लेट, पालक आणि मशरुम असलेलं एकदम हेल्दी ऑम्लेट आणि मुंबईकरांच्या लाडक्या वडापावच्या स्टाईलमध्ये सर्व्ह होणारं मुंबय्या ऑम्लेट...याशिवाय जगप्रसिद्ध स्पॅनिश ऑमलेट, फ्रेंच टोस्ट आणि सगळ्या वयोगटातल्या लोकांना आवडणारं चिज ऑमलेट..इतक्या वेगवेगळ्या प्रकारची तर केवळ ऑम्लेट मिळतात..पुण्याच्या यॉल्कशायरमध्ये या सगळ्या ऑम्लेटच्या प्रकारांबरोबरच कॉर्न चिज ऑम्लेट मिळतं..ज्यात फोल्ड केलेल्या ऑमलेटमध्ये कॉर्न आणि चिज भरलेलं असतं, बरं प्रत्येक ठिकाणी या ऑम्लेटबरोबर सर्व्ह केले जाणारे पदार्थही अगदी वेगवेगळे, कुठे सोबत ब्रेड असतो, तर कुठे चक्क गार्लिक ब्रेड, काही ठिकाणी ब्रेडच्या जोडीला फ्रेंच फ्राईजसुद्धा दिले जातात तर काही ठिकाणी पोटॅटो वेजेस..पुण्याच्या योल्कशायरमध्ये ऑमलेट विथ थाय करी असा एक भन्नाट प्रकार मिळतो ऑमलेटचा, ज्यात ऑम्लेटच्या घडीमध्ये बेसिल राईस आणि रेड थाय करी सर्व्ह केली जाते...ऑम्लेटच्या जोडीला थाय करीची चव खरोखर वेगळी आणि जबरदस्त लागते... एग बास्केट एग बास्केट जितके वेगवेगळे प्रकार ऑम्लेटचे तितकेच वेगळी सॅण्डविचेस आणि त्यांच्या चवीही..काही सॅण्डविचेस ओपन सॅण्डविचेस, तर काहीत दोन ब्रेडच्या तुकड्यात अंड्याबरोबर विविध चवदार पदार्थांचा जबरदस्त भरणा.. नॉर्मल सॅण्डविच ज्यात उकडलेली अंडी आणि चिज असा मसाला असतो, एक प्रकार भुर्जी सॅण्डविचचा, ज्यात ब्रेड किंवा गोल पावांच्या मधोमध थेट चमचमीत भुर्जी भरलेली असते..काही ठिकाणी हे भुर्जी सॅण्डविच झणझणीतही मिळतं.. याशिवाय चिकन आणि एग सॅण्डविच, खिमा सॅण्डविच असे नॉनव्हेज पर्याय तरुणाईच्या जबरदस्त पसंतीला पडतात.. पण या पारंपरिक पदार्थांशिवाय खरी गंमत येते ती अंड्यापासून केलेल्या नवीन प्रयोगांची चव चाखण्यात...एग बास्केट नावाचा नाविन्यपूर्ण पदार्थ याच पठडीतला...एखादी टोपली किंवा नावेचा आकार वाटावा अशा आकाराच्या आणि जरासा खोलगट असलेल्या मल्टीग्रेन पावात बिन्सची ग्रेवी, बॉईल्ड किंवा पोच्ड एग आणि त्यावर चिज, कांदा आणि चटण्या असा हा सिझलरच्या जवळ जाणारा अंड्याचा प्रकार ठाण्याच्या एव्हरीडे अंडेमध्ये जाणारे अंडाप्रेमी अगदी आवर्जुन खातात. मुंबय्या ऑम्लेटचीही मजा वेगळीच. मुंबय्या ऑम्लेट मुंबय्या ऑम्लेट आपल्या वडापावप्रमाणे चटण्या आणि कांद्याच्या जोडीनं पावात भरलेलं हे खास मुंबईकरांसाठीचं ऑम्लेट अंड्याच्या चवीचा वडापाव खातोय की काय अशी जाणीव करुन देतं...अशा एगमय किंवा अंडीमय रेस्टॉरन्टमध्ये फक्त नाश्त्यालाच जावं लागणार, जेवणासाठी ही जागा नाही असा समज अनेकांचा होतो, पण इथे अंड्याचा अंतर्भाव असलेले वेगवेगळ्या प्रकारचे भात आणि अंडाकरीचेही वेगवेगळे प्रकार असल्याने जेवणात अंड ज्यांना आवडतं अशांनी बिनधास्त असली अंड्याची रेस्टॉरन्टस गाठावी..एंडा बिर्याणी, चिकन आणि एग बिर्याणी, इटालियन राईस विथ एग किंवा सरळ अंडा पुलाव असे कितीतरी प्रकार केवळ भाताचे मिळतात..तितकंच वैविध्य करी किंवा भाजी प्रकारात मोडणाऱ्या अंड्याच्या डिशेसमध्ये दिसतं..आपल्याला घरोघरी झटपट बनणारी किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या अंड्याच्या गाडीवर हमखास मिळणारी अंडाभुर्जीही कितीतरी वेगवेगळ्या मसाल्यात आणि चवीत इथे आपल्यासमोर सादर होते..आपल्याला ठाऊक असलेली मसाला भुर्जी, पारसी स्टाईलनं केलेली अकुरी भुर्जी, काजुच्या साथीनं केलेली भुर्जी आणि उत्तर भारतीय पद्धतीनं केलेली नवाबी भुर्जी..अंडा भुर्जी किंवा अंडा करीचे असे विविध प्रकार पाहून जाणवंत की एरव्ही असे इतक्या वेगवेगळ्या प्रकारात पनीर फक्त इतर ठिकाणी सर्व्ह होतं, पण आता ही रेस्टॉरन्टस फक्त अंड्यासाठीची असल्यानं इथल्या प्रत्येक डिशचा हिरो अंडीच असतात.. जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे नवनवीन प्रयोग चाखावेसे वाटत असले तरी मनापासून ज्यांना अंडी आवडतात त्यांना काही पारंपरिक प्रकारचे अंड्याचे पदार्थ अगदी हवेच असतात..जसा की अगदी साधा पण चविष्ट फ्रेंच टोस्ट, किंवा साधी हाफ फ्राय अंडी, तसंच एग बेनेडीक्ट नावाचा पदार्थ..किंवा अगदी अंडी घालून केलेला पराठा हे पदार्थही चाखायचे तर असे स्पेशालिटी रेस्टॉरन्ट म्हणजे परफेक्ट जागा.. इतर वेळी बाहेर खाणं, बाहेरचे तुमच्या आमच्या आवडीचे पदार्थ चाखणं तब्येतील मारक असूनही केवळ रसना तृप्तीसाठी आपण ते करतो याची कधी किंचित तर कधी खूप जास्त खंत आपल्या प्रत्येकाच्या मनात असतेच.. पण प्रोटीन्सची खाण असलेल्या अंड्याच्याच डिशेस देणाऱं रेस्टॉरन्ट जर आपला चॉईस असेल तर मात्र तेलकट खातोय, अनहेल्दी खातोय अशी खंत न बाळगता जिभेचे चोचले पुरवता येतात...
जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे

संबंधित ब्लॉग :

जिभेचे चोचले - सीएसटीपेक्षाही जुनं पंचम पुरीवाला

जिभेचे चोचले : फ्रेंच फ्राईजसाठी  – ‘द जे’

जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29

जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री

जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना

जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर

जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई  जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navratri 2024: अदानी एनर्जीचा मोठा निर्णय; मुंबईतील नवरात्रौत्सव मंडळांना स्वस्त दरात वीज, जाणून घ्या अर्ज करण्याची  A टू Z प्रक्रिया
नवरात्रीत अदाणीतर्फे सवलतीच्या दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोलवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय
राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोलवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय
Uddhav Thackeray : रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 30 सप्टेंबर 2024: ABP MajhaLadki Bahin Yojana Scam : नाव बहिणीचं; लाभार्थी पुरूष; नांदेड जिल्ह्यात मोठा घोटाळाDilip Walse Patil :  शरद पवारांना भेटणार असल्याच्या बातम्या निराधार आणि खोडसाळAashish Hemrajani : Book My Showचे सीईओ आशिष हेमराजानी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navratri 2024: अदानी एनर्जीचा मोठा निर्णय; मुंबईतील नवरात्रौत्सव मंडळांना स्वस्त दरात वीज, जाणून घ्या अर्ज करण्याची  A टू Z प्रक्रिया
नवरात्रीत अदाणीतर्फे सवलतीच्या दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोलवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय
राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोलवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय
Uddhav Thackeray : रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Embed widget