Horoscope Today 10 July 2023 : आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 10 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 10 July 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांनी आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कन्या राशीच्या लोकांना अभ्यासात काही अडचण येऊ शकते. आजचा सोमवार मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत काही मोठा फायदा मिळू शकतो, तुम्हाला बढती देखील मिळू शकते. कुटुंबातील मतभेद प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा.आज कोणाबद्दलही राग मनात ठेवू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील व्यवहारांबाबत थोडे सावध राहा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. आज जोडीदाराशी खूप काळजीपूर्वक बोला, अन्यथा तुमच्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होऊ शकतात. ज्यामुळे घरात तणावाचं वातावरण होऊ शकतं.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आपल्या कुटुंबियांबरोबर धार्मिक कार्यक्रमात घालवा. तुमच्या मनाला शांती मिळेल. विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षणासाठी चांगली संधी आहे. नोकरदार वर्गाला आज नोकरीत चांगली संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचा राग नियंत्रणात ठेवा अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. आज तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज तुमची बालपणीच्या मित्राबरोबर अचानक भेट होऊ शकते. जर तुमच्या कुटुंबात काही गैरसमजामुळे वाद झाला असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत बदलीची बातमी ऐकायला मिळेल, पण यामध्ये तुम्हाला धनलाभ होईल. वैयक्तिक आयुष्यात मोठा निर्णय घेताना खूप गोंधळून जाल, तुमचे पालक तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी साथ देतील. जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. अनावश्यक पैसे खर्च करू नका.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक कामे घरी बसून पूर्ण होतील, त्यामुळे तुम्हाला नफाही मिळेल आणि पैशाचीही बचत होईल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क राहा. अनावश्यक घराबाहेर पडू नका. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. ज्यामुळे तुम्हाला धनलाभही मिळू शकतो. तुम्ही कोणताही व्यवसाय केलात तर तुम्हाला व्यवसायातही नफा मिळेल आणि तुम्हाला प्रगतीच्या नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमचे मन दिवसभर खूप आनंदी असेल. तुम्ही खूप मेहनती व्यक्ती आहात, तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळू शकते. नोकरीत बदलही होऊ शकतो आणि आर्थिक लाभही होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा निर्णय घेऊ शकता. हा निर्णय तुमच्या जोडीदाराशी किंवा मुलाशी संबंधित असेल. तुमच्या प्रामाणिकपणाचा तुमच्या प्रियजनांना फायदा होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात आणि नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. आज फक्त बोलण्यावर नियंत्रण ठेवा. घरात शांतता नांदण्यासाठी धार्मिक पूजा किंवा हवन करू शकता.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाने भरलेला असेल. तुम्ही खूप मेहनती व्यक्ती आहात, त्यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचे अनावश्यक पैसे खर्च होतील. खूप दिवसांपासून एखादे नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या विवाहाशी संबंधित समस्या सोडवू शकाल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज तुमच्या बोलण्यात कठोरपणा दिसून येईल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदी असणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला नोकरीत नवीन संधी मिळू शकते. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर बसून भविष्यासाठी नवीन योजनाही आखू शकता. आज तुम्हाला काही नवीन लोक भेटू शकतात, ज्यांच्या कल्पनांच्या सहकार्याने तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो. तुमच्या आर्थिक बाबींशी संबंधित कोणतीही समस्या सोडवली जाईल. आज तुम्हाला तुमच्या वडिलोत्पार्जित संपत्तीतून काही आर्थिक लाभ मिळू शकतो.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा तणावाचा असेल. व्यवसायातील एखाद्या गोष्टीबाबत काही तणाव निर्माण होऊ शकतो. नोकरदार वर्गाला नोकरीमध्ये चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. आज घरात पाहुण्यांचं सुद्धा काही कारणास्तव आगमन होऊ शकतं. घरात अनावश्यक खर्च वाढू शकतो. तुमचे कुटुंबीय किंवा मित्रांबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात, मन शांत ठेवून वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते. आजच्या दिवशी योग किंवा चिंतन करणं फायद्याचं ठरेल.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशस्वी राहील. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात यश मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती होईल. आज तुमचा कुटुंबियांबरोबर चांगला वेळ जाईल. तुमचे कौटुंबिक जीवन खूप आनंदी असेल. आज कोणतीही गुंतवणूक करणार असाल तर अनुभवी लोकांचा सल्ला घ्यायला विसरू नका. कामावर लक्ष केंद्रित करा. राजकारणात चांगली संधी आहे. मित्रांचं सहकार्य मोलाचं ठरेल.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप कष्टाचा असेल. जर तुम्ही कोणताही व्यवसाय केलात तर तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. आज तुमचा दिवस तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंदी करण्यात जाईल. तुमच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घ्या. आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराला खूश करण्यासाठी वैयक्तिक जीवनात कठोर परिश्रम करावे लागतील. नोकरीत तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुम्हाला कार्यक्षेत्रात तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मनावर संयम ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. जे लोक शिक्षणाशी संबंधित कोणत्याही कामात गुंतलेले आहेत, त्यांना फायदा होईल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. जमिनीशी संबंधित कोणतीही प्रकरणे निकाली निघतील. आज तुमच्या कुटुंबियांबरोबर धार्मिक कार्यात सहभागी व्हा. व्यवसायात नवीन योजनांची संधी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमचा दिवस उत्साहाने जाईल. तुमचे काही रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. आज तुमच्या राशीमध्ये प्रवास होण्याची शक्यता आहे. हा प्रवास तुमच्यासाठी आनंददायी असेल. तुम्ही व्यवसायाशी संबंधित नवीन योजना राबवू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळू शकेल. आज तुमचा कल धार्मिक संगीताकडे जाईल. आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात काही मोठा फायदा होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते. आरोग्याची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :