एक्स्प्लोर

Horoscope Today 09 July 2023 : मेष, सिंह, धनु राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 09 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 09 July 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांनी आज आपल्या कामात व्यस्त राहण्याबरोबरच आपल्या प्रियजनांसाठी थोडा वेळ काढावा. कन्या राशीच्या लोकांनी आज बोलण्यात गोडवा ठेवावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. एकूणच आजचा रविवार मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. जर तुम्ही काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ शुभ आहे. या कामात तुम्हाला खूप फायदा होईल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा चढ-उताराचा असेल. त्यामुळे तुम्ही थोडे तणावात दिसाल, त्यामुळे तुमची तब्येत थोडी बिघडू शकते. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या वागण्यातील कठोरपणामुळे कुटुंबात काही तणाव निर्माण होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्तींचा आदर करा. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा संघर्षाचा आहे. एखादं काम करण्यासाठी खूप मेहनत करावी लागू शकते. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ न मिळाल्यास तुम्ही थोडे चिंतेत असाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडचण येऊ शकतात. त्यांचे लक्ष अभ्यासातून विचलित होऊ शकते. आज तुम्ही आरोग्याची विशेष काळजी घ्या. नोकरदार वर्गासाठी येणारा काळ चांगल्या संधी घेऊन येणारा असेल. आज संध्याकाळचा वेळ तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर घालवा. यामुळे तुमच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि तुम्ही आनंदी राहाल. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त राहील. तुम्ही खूप मेहनती आहात, पण तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळालं नाही, तर तुम्ही अस्वस्थ व्हाल. जर तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल काळजी वाटत असेल तर नोकरी सोडण्याचा निर्णय सावधगिरीने घ्या. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबातील ऐक्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसणार आहेत. कोणत्याही चुकीच्या गोष्टीला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. आरोग्याबाबत सावध राहा. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. विद्यार्थी मोठ्या मनाने स्पर्धेची तयारी करताना दिसतील. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या मित्रांना साथ देऊ नका. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. सर्व खर्च बजेट करून केले तर बरे होईल. मित्राच्या मदतीने बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरी पूजा, पाठ आयोजित होतील. जोडीदाराच्या तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. राजकारणात करिअर करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्ही आज अतिरिक्त पैसे कमवू शकता. कुटुंबातील सदस्यांचा चांगला सल्ला तुमचा मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रभावी ठरेल. जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एखाद्या तज्ञाशी सल्लामसलत केल्यास चांगले होईल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासाठी काढा, जिथे तुम्ही चांगल्या गोष्टी बोला. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. संमेलनांना संबोधित करण्याचीही संधी मिळणार आहे. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामे पूर्ण होतील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमच्या मनात झटपट पैसे कमावण्याची इच्छा जागृत होईल. बदलत्या हवामानामुळे आईच्या तब्येतीत चढ-उतार असतील.  विद्यार्थ्यांना कोणत्याही नवीन विषयाचा अभ्यास करण्याची संधीही मिळेल. शेजारच्या वादात पडणे टाळा. धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. मित्रांच्या मदतीने नवीन संधी मिळतील. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जे व्यवसाय करत आहेत, त्यांना व्यवसाय पुढे नेण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. नवीन संपर्क वाढतील. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला हळूहळू मिळतील. तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदाराबरोबर धार्मिक स्थळाला भेट देण्याचा बेत होईल. मुलांच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. एखाद्या खास व्यक्तीसोबत भेटही होईल. एखादे काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर वेळ चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. घर, फ्लॅट, दुकान खरेदी करण्यासाठी तुम्ही ज्या योजना आखत होतात त्यात तुम्हाला यश मिळेल. प्रेम जीवन जगणारे लोक आपल्या प्रियकरासह आनंदाचे क्षण घालवतील.

वृश्चिक

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, त्यांच्यासोबत मजा करा. तुम्हाला प्रसन्न वाटेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील, ज्यामुळे व्यवसायात यश मिळेल.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असल्याने नोकरदार लोकांना थोडा त्रास होईल. धीर धरा कारण तुमची समज आणि प्रयत्न तुम्हाला नक्कीच यश मिळवून देतील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करा. आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळाल्यास पालक खूप आनंदी दिसतील. तुम्ही शेजारच्या परिसरात होणार्‍या पूजा-पाठात सहभागी व्हाल. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही खास नाही. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बराच वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकणार नाही. नोकरदारांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. तुम्हाला अचानक प्रवासाला जावे लागू शकते. प्रवास तुमच्यासाठी ठीक राहील. अनोळखी व्यक्तीची भेटेल. कोणाच्याही सल्ल्याने पैसे गुंतवू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुमच्या तब्येतीत सुधारणा होईल. रोजच्या दिनचर्येत मॉर्निंग वॉक आणि योगा यांचा समावेश असेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, तुम्हाला आर्थिक लाभ होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. पैसे कसे वाचवायचे ते तुम्ही तुमच्या वडिलांकडून शिकून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. घर, फ्लॅट घेण्याचे नियोजन होते, ते यशस्वी होईल. नवीन वाहनाचा आनंदही मिळू शकतो. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल.

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील. कुटुंबात सुरू असलेल्या समस्यांवर उपाय शोधण्यात सक्षम व्हाल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना भरपूर नफा मिळेल. तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक सदस्यांसोबत तुम्ही काही धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना करा. समाजाच्या हितासाठी केलेल्या कार्याचा सन्मान मिळेल. घरामध्ये पूजा, पाठ आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांची ये-जा सुरु असेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 26 April 2023 : मेष, कन्या, धनु राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
Datta Jayanti 2025: आज दत्त जयंती! शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा फळ, कोण होते भगवान दत्तगुरू? A टू Z माहिती जाणून घ्या..
आज दत्त जयंती! शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा फळ, कोण होते भगवान दत्तगुरू? A टू Z माहिती जाणून घ्या..
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis On Devendra Fadnavis : युतीचा घटस्फोट, नवा गोप्यस्फोट Special Report
Sangli Ashta EVM Scam : वाढला टक्का, सांगलीत खटका; मतदानामध्ये तफावत, राजकीय आफत Special Report
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
Datta Jayanti 2025: आज दत्त जयंती! शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा फळ, कोण होते भगवान दत्तगुरू? A टू Z माहिती जाणून घ्या..
आज दत्त जयंती! शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा फळ, कोण होते भगवान दत्तगुरू? A टू Z माहिती जाणून घ्या..
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
Embed widget