Shani Asta 2026 : 13 मार्चला शनिचा होतोय अस्त; पुढचे 40 दिवस 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु, मागाल ती इच्छा शनिदेव करणार पूर्ण
Shani Asta 2026 : नवीन वर्षात 13 मार्च 2026 रोजी शनि मीन राशीत अस्त होणार आहे. या ठिकाणी तो 22 एप्रिल 2026 पर्यंत स्थित असणार आहे. त्यामुळे या काळात शनि जास्त प्रभावी नसणार आहे.

Shani Asta 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला (Shani Dev) कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. सर्व ग्रहांमध्ये शनि (Shani Ast) सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. त्यामुळे जेव्हा शनिच्या स्थितीत बदल होतो तेव्हा त्याचा प्रभाव संपूर्ण मानवी जीवनावर पाहायला मिळतो. नवीन वर्षात 13 मार्च 2026 रोजी शनि मीन राशीत अस्त होणार आहे. या ठिकाणी तो 22 एप्रिल 2026 पर्यंत स्थित असणार आहे. त्यामुळे या काळात शनि जास्त प्रभावी नसणार आहे.
'या' वेळेत शनि होणार अस्त
शनि देव 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी अस्त होणार आहे. तर, 22 एप्रिलच्या पहाटे 4 वाजून 49 मिनिटांनी पुन्हा उदय होणार आहे. जवळपास 40 दिवसांच्या या कालावधीत शनिचा प्रभाव काहीसा कमी होतो. अनेकदा लोक शनिच्या अस्ताचा काळ नकारात्मक मानतात. मात्र, ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने हा काळ कोणत्याही राशीसाठी कष्टायचा नसतो. त्यामुळे शनिच्या अस्ताने कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
या राशीच्या बाराव्या चरणात शनिचा अस्त होणार आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसेल. तसेच, या राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे शनिच्या अस्ताने तुम्हाला मानसिक शांती लाभेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
या काळात तुमच्या करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. शनिच्या अस्ताने नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या दुसऱ्या चरणात शनिचा अस्त होणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. तुम्हाला चांगली मानसिक शांती लाभेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीतच शनिचा अस्त होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. तुमचा मानसिक तणाव कमी होईल. तसेच, तुमच्यात सकारात्मक ऊर्जा दिसून येईल. कामाच्या निमित्ताने प्रवास होईल. मात्र, हा प्रवास तुमच्यासाठी सुखाचा असेल. नवीन गोष्टी शिकून घ्याल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Horoscope Today 8 March 2026 : आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा होणार परिणाम? कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य



















