Horoscope Today 02 June 2023 : वृषभ, कन्या, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी व्यवहारात सावधगिरी बाळगा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 02 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 02 June 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल. तर, मिथुन राशीच्या लोकांना गुंतवणुकीचा लाभ मिळेल. धनु राशीच्या लोकांनी कोणाच्याही सल्ल्याशिवाय कोणतेही काम करू नये. आजचा दिवस मेष ते मीन राशीसाठी नेमका कसा असणार? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. आज तुम्हाला फार उत्साही वाटेल, कारण तुमची सर्व रखडलेली कामे आज पूर्ण होतील. आज तुम्हाला आईचं पूर्ण सहकार्य मिळेल. भाऊ-बहिणींबरोबर दिवस आनंदात जाईल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरोघरी पूजा आणि पाठही आयोजित केले जातील. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. योगा, ध्यान करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरात आनंदाचे वातावरण असेल ज्यामुळे तुमचा तणाव कमी होईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. जे लोक व्यवसाय करत आहेत, ते व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी होतील. तुम्ही एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना देखील आखू शकता. तुमची गुंतवणूक आणि भविष्यातील योजनेबद्दल कोणाला कल्पना देऊ नका. तुमच्या जोडीदाराच्या निष्काळजीपणामुळे नात्यातील अंतर वाढू शकते. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रत्येकजण आपापले सुख-दु:ख एकत्र शेअर करताना दिसणार आहे. वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडणं गरजेचं आहे. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना आपल्या घरची आठवण येईल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला समाजाचं भलं करण्याची संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. सरकारी योजनांचाही लाभ मिळेल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर त्याचाही पूर्ण फायदा होईल. आज तुम्हाला तुमच्या आई किंवा वडिलांच्या तब्येतीवर खूप पैसे खर्च करावे लागतील, यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल पण त्याच वेळी नाते आणखी घट्ट होईल. आज तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. वरिष्ठांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. जे बेरोजगार आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी काळ चांगला आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. जे लोक घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. उच्च अधिकाऱ्यांशी बोलण्यात गोडवा ठेवा. तब्येतीची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या अनुकूल राहील. हा दिवस सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. दिवसभरात तुम्ही भविष्यासाठी चांगल्या योजना आखू शकता. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले तर सर्व कामे पूर्ण होतील.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. आज तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरोघरी भजन, कीर्तन, पूजा-पाठाचेही आयोजन केले जाईल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत देखील मिळतील. आज दिवसातीस काही वेळ तुम्ही स्वत:साठी काढा. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची कामे करा. तुम्हाला फार प्रसन्न वाटेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून हा काळ कठीण आहे. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल.
तूळ
आज तूळ राशीच्या लोकांचा दिवस आनंदात जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे पद आणि अधिकार वाढतील. आज तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात सरप्राईझ भेट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे योग्य निराकरण न झाल्याने ते अस्वस्थ राहतील. आज कुटुंबीयांसह सहलीला जाण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या कामात वडिलांचे सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. न्यायालयीन खटले आज तुमच्या बाजूने येण्याची दाट शक्यता आहे. आज तुमची धार्मिक कार्यात रुची वाढेल, तसेच तुम्ही धार्मिक कार्यात भाग सहभाग घ्याल.
वृश्चिक
आज वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस आहे. प्रेम जीवनात नवीन उर्जेचा संचार होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज कुटुंबातील सर्व सदस्य कोणत्याही शुभ कार्यक्रमाच्या विशेष तयारीमध्ये सहभागी होऊ शकतात, ज्यामध्ये खर्च देखील जास्त असेल. आज तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. कोणत्याही सरकारी संस्थेतून दूरगामी लाभ मिळण्याची आज शक्यता निर्माण होईल. अचानक संध्याकाळी मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना आज एकाग्रता ठेवावी लागेल, तरच यश मिळण्याची शक्यता आहे.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यवृद्धीचा आहे. भविष्य मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी केलेले प्रयत्न आज कामी येतील. आज तुमचे काही नवीन संपर्क वाढतील. परंतु, दैनंदिन कामात हलगर्जीपणा करू नका. सरकारी कामांनाही आज गती मिळेल, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज तुम्हाला एखाद्या विशेष कार्यक्रमांतर्गत अडकलेले पैसे मिळतील. तुमचे मन प्रसन्न राहील, तुमचा कल आज श्रद्धा, धर्म आणि अध्यात्माकडे जाईल. समाजसेवेशी निगडित विद्यार्थ्यांची प्रतिष्ठा आज वाढेल आणि तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल.
मकर
मकर राशीच्या लोकांचा दिवस प्रेम आणि सहकार्याने भरलेला असेल. वैवाहिक जीवनातही सौम्यता राहील. तुमच्या पराक्रमात वाढ झाल्यामुळे शत्रूंचे मनोबल खचलेले दिसेल. अचानक पाहुण्यांच्या आगमनाने मन प्रसन्न राहील, परंतु आज तुम्हाला नकारात्मक विचार टाळावे लागतील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. आज कुटुंबातील वरिष्ठांशी भविष्यातील योजनांवर चर्चा करा. आज तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज कार्यक्षेत्रात कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याशी मतभेद होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. केवळ आपल्या कामात लक्ष द्या, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांचा आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. भावंडांशी बोलून सर्व मतभेद दूर होतील. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात. आज जमीन आणि वाहन खरेदीची शक्यता आहे. आज सरकारी नोकऱ्या असलेल्या लोकांसाठी बदलीची शक्यता निर्माण झाली आहे. कौटुंबिक सुखांचा उपभोग घ्याल. प्रिय घरगुती वस्तूंची खरेदी करता येईल. जीवाणूजन्य आजारांपासून सावध राहणे आवश्यक आहे. जुने व्यावसायिक संबंध तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी देतील. प्रेम जीवनात आज नवीन ताजेपणा जाणवेल. आज व्यवसायात कौटुंबिक संबंधांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
मीन
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस मुलांशी संबंधित समस्या सोडवण्यात होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. आज तुम्हाला जमीन आणि इमारतीशी संबंधित प्रकरणांमध्ये थोडा दिलासा मिळेल. क्षेत्रात काही विशेष यश मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील, परंतु हवामानातील बदलाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्याची विशेष काळजी घ्या. प्रेम जीवनात आज गोडवा राहील आणि इतरांनाही समजून घेण्याचा प्रयत्न कराल. तुमची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे, तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज जोडीदाराच्या भावनांची पूर्ण काळजी घ्या. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :