Vastu Tips : घराचा आरसा तुमचे नशीब बदलवू शकतो, लक्षात ठेवा या गोष्टी
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते. त्याचबरोबर या गोष्टी वास्तूनुसार ठेवल्या नाहीत तर खूप त्रास सहन करावा लागतो.
Vastu Tips : घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा तुमच्या जीवनावर परिणाम होत असोत. वास्तूशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते. त्याचबरोबर या गोष्टी वास्तूनुसार ठेवल्या नाहीत तर खूप त्रास सहन करावा लागतो. अशा अनेक वस्तूंचा वापर प्रत्येक व्यक्ती रोज करत असते. परंतु, त्याला हे माहित नाही की ही गोष्ट तुमचे नशीब बदलू शकते. घरात आरसा लावताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या, जेणेकरून आयुष्यात कोणताही अडथळा येणार नाही.
घरात आरसा लावताना काय काळजी घ्याल?
आरसा नेहमी जमिनीपासून काही इंच वर ठेवावा. यामुळे व्यवसायात भरपूर नफा मिळतो.
घरात धन-समृद्धी वाढवण्यासाठी ज्या कपाटात पैसे आणि दागिने ठेवता त्या कपाटात आरसा लावा.
घरामध्ये आरसा उत्तर, पूर्व आणि ईशान्य दिशेला ठेवा, त्यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह होतो.
गोल आकाराचा आरसा कधीही वापरू नका कारण ते शुभ नाही. आयताकृती आणि चौकोनी आरसे वापरणे चांगले.
तुटलेला आरसा जीवनात संकट आणू शकतो, त्यामुळे घराचा आरसा तुटला असेल तर तो लगेच काढून टाका.
घरामध्ये कधीही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला आरसा ठेवू नका. कारण या दिशेला आरसा ठेवल्याने त्रास होतो.
बेडरूममध्ये आरसा लावू नका आणि आरसा असला तरी तो अशा ठिकाणी ठेवावा, जिथे झोपलेल्या व्यक्तीला त्याचे प्रतिबिंब दिसत नाही.
शिडीखाली कधीही आरसा ठेवू नका. असे केल्याने घरातील वातावरण बिघडते.
हे देखील वाचा