(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Broom Vastu Tips : घरातील झाडूकडे दुर्लक्ष करताय? देवी लक्ष्मी होईल नाराज! जाणून घ्या झाडूशी संबंधित ‘या’ गोष्टी
Broom Vastu Tips : झाडूच्या संदर्भात काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. काही सोप्या गोष्टी केल्यास धनाची देवी अर्थात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
Vastu Tips : घरातील झाडू म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतिक, हे आपण बालपणापासूनच ऐकत आलो आहोत. देवी लक्ष्मी ही धनसंपत्तीची देवता आहे. मात्र, घरात असलेल्या तिच्या या प्रतिकाची आपण व्यवस्थित काळजी घेत नाही. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. ज्याचा परिणाम थेट आपल्या घरावर देखील दिसून येतो. यामुळेच घरातील झाडूची नेहमी काळजी घ्यावी असे वास्तुशास्त्रात (Vastu Tips) सांगितले जाते.
झाडूच्या संदर्भात काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. काही सोप्या गोष्टी केल्यास धनाची देवी अर्थात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. झाडूच्या बाबतीत केलेल्या छोट्या-छोट्या चुका गरीबी आणि आर्थिक संकट तर वाढवतातच, पण वास्तूवरही परिणाम करतात. त्यामुळे झाडूच्या बाबतीत ‘या’ गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
झाडू कशी ठेवावी?
झाडूसाठी घरात एक विशेष जागा असावी. तसेच ती कशा पद्धतीने ठेवावी याची काळजी घेतली पाहिजे. पौराणिक मान्यतेनुसार झाडू नेहमी आडवी ठेवावी. यासोबतच झाडू नेहमी घराच्या दक्षिण दिशेला असावी. यामुळे घरातील पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
दिवाळीत करावे झाडू दान
झाडू एखाद्याला दान करणे ही देखील देवी लक्ष्मीची पूजा मानली जाते. यामुळे धन संपत्तीत वाद होते, असेही म्हटले जाते. पौराणिक मान्यतेनुसार दिवाळीच्या दिवशी मंदिरात झाडू दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सगळ्या आर्थिक समस्या दूर होतात. अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते.
पलंगाखाली झाडू ठेवू नका
झाडू कधीही पलंगाखाली ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार, बेडच्या खाली झाडू ठेवल्याने मन आणि मेंदूवर नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे घरातील सदस्यांमध्ये आपसांत दुरावा निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवते. घरात मुलं असतील, तर त्यांच्यात भांडणे सुरु होतात. यासोबतच घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो.
‘या’वेळी चुकुनही केर काढू नये!
घरातील केर काढताना वेळेची देखील विशेष काळजी घ्यावी. यामध्ये अनेकदा लोक चुका करतात. त्यामुळे वास्तू प्रभावित होऊ लागते. पौराणिक मान्यतेनुसार दिवसातून किमान चार वेळा घर झाडूने स्वच्छ केले पाहिजे. नेहमी सकाळी सूर्य उगवल्यानंतर झाडू मारावी. त्याचबरोबर संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी झाडूने घराची स्वच्छता करावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हे देखील वाचा-