Horoscope Today 1 March 2026 : आज मार्चचा पहिलाच दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होणार पूर्ण, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 1 March 2026 : आज रविवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 1 March 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 1 मार्च 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज वाहने जपून चालवावी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल शिवाय व्यवसायामध्ये पार्टनरशिप पटवून घ्यावे लागेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
तुमच्यातील चांगुलपणाला लोक दात देतील वाईट यातून चांगले घेण्याची गुण ग्राहकता ठेवाल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
महिलांना मानसिक अस्थिरता जाणवेल नोकरी व्यवसायात काही भरीव बदल करायचे मनात येईल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
एखाद्या गोष्टीचे निरीक्षण परीक्षण फार चांगल्या पद्धतीने कराल याचा उपयोग तुम्हाला निश्चित होईल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
भरपूर कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल परंतु त्याचे फळही मिळेल.
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील घरामध्ये दुरुस्तीचे काम निघेल त्यासाठी पैशाची तजवीज करावी लागेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
प्रेम प्रकरणांमध्ये जोडीदाराच्या मनासारखे वागण्याचा आटापिटा करावा लागेल तरी सुद्धा मानसिक समाधान मिळणार नाही.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
कुटुंबामध्ये नेहमीपेक्षा वातावरण जरा नरम गरम गरमच राहील त्यामुळे महिलांना सामोपचाराचे धोरण स्वीकारणे भाग पडेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आज जशी संधी मिळेल तसे वागण्याचा प्रयत्न राहील काही वेळेस द्विधा मनस्थिती पण होऊ शकते.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज कलात्मक काम करणाऱ्यांना अनेक संधी मिळतील, महिलांना आपले छंद जोपासता येतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आज कृती ऐवजी वैचारिक गोंधळ फार होतील त्यामुळे चांगली बुद्धी असूनही केवळ या गोष्टीमुळे तुम्ही मागे पडण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces Horoscope Today)
जोडीदाराला समजून घेतले तरी त्याच्या मनाचा थांg पत्ता लागणार नाही विद्यार्थी मुडी बनतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















