पारंपरिक पिकांना फाटा देत शतावरी, अश्वगंधाची लागवड; तरूण शेतकरी कमावतोय लाखो रूपये
नंदुरबार जिल्ह्यातील एकनाथ चौधरी या तरूण शेतकऱ्याने पारंकारिक पिकांना फाटा देत शतावरी आणि अश्वगंधा या औषधी पिकांची लागवड केली आहे. यातून चौधरी यांनी मोठ्या प्रमाणात नफा कमावला आहे.
नंदुरबार : बदलत्या काळानुसार शेतकरीही पारंपरिक पिकांना फाटा देत शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. सतत बसणारा नैसर्गिक आपत्तीचा फटका त्यासोबत रोगांचा प्रादुर्भाव यावर पर्याय म्हणून शहादा तालुक्यातील पुसनद येथील तरुण शेतकऱ्याने शतावरी आणि अश्वगंधाची लागवड केली आहे. एकनाथ चौधरी असे या तरूण शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी पारंकारिक पिकांना फाटा देत शतावरी आणि अश्वगंधा या औषधी पिकांची लागवड केली आहे. यातून चौधरी यांनी मोठ्या प्रमाणात नफा कमावला आहे. त्यांच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनीही मसाले आणि आयुर्वेदिक पिकांच्या लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ चौधरी यांनी आपल्या दहा एकर शेतात अश्वगंधाची लागवड केली आहे. शतावरी आणि अश्वगंधाची पाने मुळे कंद आणि बियांची विक्री करून चांगला नफा मिळवला आहे. अश्वगंधाच्या मुळाची वर्गवारी करून त्याची विक्री होत असते. त्याला 10 हजार क्विंटल पासून ते 40 हजारपर्यंत गुणवत्तेनुसार भाव मिळतो असे चौधरी सांगतात.
अश्वगंधाचा पाला आणि रोपांना मोठी मागणी असते. शिवाय याला बाजारपेठ उपलब्ध असून मागणी पेक्षा उपलब्धता कमी आसल्याने दर पडण्याची भीती नसते. त्याचबरोबरच या औषधी वनस्पतीवर कीड पडण्याची शक्यता खूप कमी असल्याने फवारणी गरज नसते. त्यामुळे पिकांच्या नुकसानीची शक्यता खूप कमी असते अशी माहिती एकनाथ चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात नावीन्य पूर्ण प्रयोग करत चौधरी यांनी पारंपारिक पिकांना फाटा देत बाजारात मागणी असलेल्या पिकांची लागवड केली आहे. चौधरी यांच्या औषधी वनस्पतीच्या शेतीकडे वळण्याचा निर्णय अनेकांसाठी आदर्श ठरेल अशा अनेक तरूण शेतकऱ्यांच्या भावना आहेत.
मत्वाच्या बातम्या
हंगामाच्या प्रारंभी जांबू फळावर अवकाळीचे सावट! पावसामुळं बागायतदारांना नुकसानीची भीती
सलाम! बार्शीतील सुर्डी गावचं 'पाणीदार' काम; आता देशात नाव, राष्ट्रीय पातळीवर मान
ढगाळ वातावरणाचा कांद्याला फटका; बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव, बळीराजा चिंतेत