AI Tech : शेतीसाठी गुगलचा पुढाकार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी 10 लाख डॉलर्सचे अनुदान
गुगलकडून (Google) कृषी क्षेत्रात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी 10 लाख डॉलर्सचे अनुदान दिले जाणार आहे.

AI Tech : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा (Indian economy) कणा आहे. त्यामुळं शेती क्षेत्राला (Agriculture sector) अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या या क्षेत्रात विविध बदल होत आहेत. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern Technology) मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. या माध्यमातून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, अशातच आता गुगलकडून (Google) कृषी क्षेत्रात कृत्रिम तंत्रज्ञानाचा (Artificial intelligence) वापर वाढवण्यासाठी 10 लाख डॉलर्सचे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानामुळं शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. त्यामुळं हवामानासह (weather forecast) शेतीबाबात अचूक माहिती मिळणार आहे.
हवामानाबाबत अचूक माहिती मिळणार
शेती क्षेत्रात (Agriculture sector) कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळं शेतकऱ्यांना (Farmers) हवामानाचा अंदाज समजणार आहे. कधी हवामान चांगल असणार, कधी हवामान खराब असणार हे आता शेतकऱ्यांना समजणार आहे. त्यामुळं शेतीबाबत निर्णय घेणं शेतकऱ्यांना सोप जाणार आहे. याशिवाय या तंत्रज्ञानाच्या मदतीने पीक आणि इतर शेतीविषयक माहितीही उपलब्ध होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे देशात शेती क्षेत्रात एक नवा आयाम निर्माण होईल.
यापूर्वीही गुगलने केली होती मदत
याआधीही, 2019 मध्ये Google कृत्रीम तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी 20 लाख डॉलरची मदत केली होती. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळं कृत्रिम तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञानाचा शेतीला मोठा फायदा होणार असल्याची माहिती गुगल रिसर्च इंडियाचे संचालक मनीष गुप्ता यांनी दिली.
AI म्हणजे काय?
AI म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI - Artificial Intelligence) होय. आर्टिफिशल इंटेलिजेंस हे मशीनला कृत्रिम बुद्धिमत्ता पुरवणारं तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाद्वारे मशीनला माहिती समजणे, त्याचं विश्लेषण करणे आणि अनुमान काढणे यासाठी मदत करते. आता या तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर केला जाणार आहे. त्यामुळं शेती क्षेत्राला याचा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
शेती क्षेत्राला सातत्यानं नव नवीन संकटांचा सामना करावा लागतो. अधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत असतात. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर खूप मोठा परिणाम होतो. हवामानातील बदलामुळं कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, चक्रीवादळं अशी संकट येतात. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसतो.
महत्त्वाच्या बातम्या:
Career in Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? AI क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी























