एक्स्प्लोर

Career in Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? AI क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी

Career in Artificial Intelligence : एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. नवीन विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे, अधिक तंत्रज्ञान व्यावसायिक एआय करिअरकडे आकर्षित होत आहेत.

Career in Artificial Intelligence : एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जातो.

जॉन मॅककार्थी (John McCarthy) यांनी 1956 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लावला होता. तसेच कालांतराने ह्या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली. भविष्यात याच तंत्रज्ञानाचा बोलबाला असणार आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे. छोट्यात छोट्या कामात या एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. तसेच आगामी काळात माहिती तंत्रज्ञानाप्रमाणेच एआय हा मानवी जीवनाचा एक भाग बनेल. मशीन लर्निंग हा सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग आहे. ज्यामध्ये एआयवर आधारित मशीन जुना डेटा एकत्रित करुन त्यांच्या मदतीने संपूर्ण माहिती जाणून घेते आणि त्यामध्ये गरजेनुसार बदल करते.

सध्या अनेक मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत. याचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करुन ते त्यांची कंपनी मजबूत बनवत आहेत. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च सेंटर उपलब्ध आहेत. तिथे यावर नवनवीन प्रयोग होत असतात. तसेच अनेक संस्था सुद्धा आहेत जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाबद्दल शिक्षण दिले जाते. अनेक शैक्षणिक संस्थांना आता परिणाम आधारित शैक्षणिक साधनांनाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे उच्चशिक्षण पद्धती हळूहळू पारंपारिक शिक्षणाच्या कोषातून बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मशीन, कॉम्प्युटर आणि यंत्र बनवून भविष्यात महत्वाची कामे करण्यासाठी मानवाच्या बदली वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच कोणतेही कठीण काम एका बुद्धिमान मशीनमार्फत केले जाऊ शकते. तसेच मशीनचा वापर 24 तास केला जाऊ शकतो. त्यामुळे जास्त उपयोग करता येऊ शकतो.

अनेक ऑनलाईन कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत ग्राहकांना अनेक चांगल्या सेवा देऊ शकतात. त्यासोबत डेटा चोरी होणे, ऑनलाईन लिक्स, ऑनलाईन फ्रॉड्स इत्यादी गोष्टींवर नियत्रंण आणता येऊ शकते. डिजिटल गोष्टीमध्ये एआयचा खूप फायदा होऊ शकतो. जसे की स्मार्टफोन्स, ऑनलाईन बँकिंग व्यवहार, ऑनलाईन डेटा, फाईल्स सुरक्षित राहू शकतात. कोणीही यांना हॅक किंवा अॅक्सेस करु शकणार नाही. त्यामुळे गोपनीयता धोरण पाळले जाईल.

एआय नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहे, त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पायाभूत सुविधांमध्ये क्षमता आणि विकास होत आहेत. उपयोजनांची गती देखील झपाट्याने वाढली आहे, आतापासून, एआय शक्यतो प्रतिमा प्रक्रिया अल्गोरिदम एका मिनिटात किंवा काही सेकंदात प्रशिक्षित करु शकते, ज्याला पूर्वी काही तास लागायचे. अहवालानुसार, एआय नोकऱ्यांच्या मागणीत वाढ झाली आहे कारण अधिकाधिक कंपन्या जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि सर्वोत्तम संभाव्य परिणाम मिळविण्यासाठी कुशल कृत्रिम बुद्धिमत्ता व्यावसायिकांच्या शोधात आहेत. एआय तंत्रज्ञान पोझिशन्सपैकी, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अधिक नोकऱ्या देणाऱ्या अग्रगण्य श्रेणी म्हणजे मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि NLP, काही नावे. गेल्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता पाच पटीने वाढली आहे. नवीन विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे, अधिक तंत्रज्ञान व्यावसायिक एआय करिअरकडे आकर्षित होत आहेत.

उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी उद्योगकेंद्रित वास्तविक प्रकल्पांचा अनुभव असलेले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) पदवीधर पुरवणे काळाची गरज आहे. भारताने अलीकडेच अर्थकारणातील अनेक क्षेत्रांमध्ये एआय पुरवण्यास वेगाने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता आधुनिक तंत्रज्ञाचा अर्थकारणावर होणारा परिणाम लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एआय संरक्षण आणि सुरक्षेबाबतच्या नवकल्पनांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच त्याचा देशाच्या भविष्यावरही परिणाम होऊ शकतो. येणाऱ्या काही वर्षांमध्ये अब्जावधी तरुण नोकऱ्या शोधण्यासाठी सज्ज होणार आहेत. या तरुणांना त्यांच्या शिक्षणाच्या योग्यतेच्या नोकऱ्या पुरवणे हे जगभरातील नेत्यांसमोरील मोठे आव्हान असेल. यापैकी अनेक तरुण भारतातील असतील.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात करिअर व्याप्ती

* कोरोनाच्या काळापासून देशात आणि परदेशात करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. आता बऱ्याच गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नोकऱ्यांवर अवलंबून आहेत. जर तुम्ही आयटी क्षेत्रातील नवीन क्षेत्रात करिअरचा मार्ग शोधत असाल, तर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स करुन तुमचे भविष्य उज्ज्वल करु शकता. भविष्यात या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. तसेच या क्षेत्रात अनेक रोजगाराच्या उत्तम संधी आहेत. जर तुम्हीही भरघोस पगाराची नोकरी करु इच्छित असाल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे क्षेत्र फक्त तुमच्यासाठी आहे. 

* दरवर्षी आयटी क्षेत्रात काहीतरी नवीन घडते. या क्षेत्रात नेहमीच मोठ्या प्रमाणात नोकऱ्या असतात. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणी खूप वाढली आहे. इंटरनॅशनल एजन्सी गार्टरच्या अहवालानुसार येत्या काळात या तंत्रज्ञानाद्वारे 40 टक्के काम केले जाणार आहे. यात मशीन लर्निंग कोर्ससह रोबोटिक सायन्ससारख्या क्षेत्रांचाही समावेश आहे.

* कोरोनाच्या कालावधीनंतर मॅन पॉवरऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अवलंबित्व वाढलं आहे. म्हणजेच त्याची व्याप्ती वाढली आहे. अभियांत्रिकी क्षेत्राच्या तुलनेत यामध्ये कमी स्पर्धा आहे. आगामी काळात आयटी, फायनान्स, सिक्युरिटी, डेटा कलेक्शन यासह अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी वाढणार आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात करिअरचा एक जबरदस्त दृष्टीकोन आहे, द डेटा टेक लॅब्सच्या संशोधन अहवालानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये 2030 पर्यंत डेटा सायंटिस्ट आणि गणिती विज्ञान व्यावसायिकांसाठी नोकऱ्यांमध्ये 33.4 टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी महत्त्वपूर्ण आहेत. तसेच 2030 पर्यंत मशीन लर्निंग, डीप लर्निंग, NLP, सॉफ्टवेअर अॅनालिटिक्स, रोबोटिक्स, प्रोग्रामर क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 29.2 टक्के अधिक कार्यात्मक क्षेत्रात संधी उपलब्ध होतील.

* आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये कॉम्प्युटर व्हिजनसारख्या मनोरंजक उपक्षेत्रांचा देखील समावेश आहे आणि त्यात मशीन लर्निंगचा समावेश आहे, जे मशीन्सना स्वतःहून कौशल्ये परिपूर्ण आणि सुधारण्यासाठी शिकवत आहेत. फोर्ब्सच्या अंदाजानुसार मशीन लर्निंग नोकऱ्या 2024 पर्यंत $31 अब्ज किमतीच्या असण्याची अपेक्षा आहे, जी सहा वर्षांत 40 टक्क्यांनी वाढेल.

* आर्टिफिशियल इंटेलिजन्स विविध क्षेत्रात आणि जीवन बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह काम करण्याची क्षमता देखील देते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वैद्यकीय व्यावसायिकांना रोग शोधण्यात आणि निदान करण्यात मदत करते. वाहतूक तंत्रज्ञानामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करते जसे की स्व-ड्रायव्हिंग वाहने, व्यवसाय क्रंच करण्यासाठी आणि कार्यक्षमतेच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतात आणि उत्पादक उपकरणे एकत्र करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतात. वार्षिक $125,000 च्या सरासरी पायाभूत पगारासह नोकऱ्या चांगल्या पगार देतात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स करिअर हे भविष्याचा पुरावा आहे कारण ते अनेक अत्याधुनिक, पुढे-विचार करण्याच्या प्रगतीचा एक घटक आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकण्यासाठी कोणते गुण असणं आवश्यक ?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स करण्यासाठी संगणक आणि गणित विषय अनिवार्य आहेत. कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधर उमेदवारही या क्षेत्रात काम करु शकतात. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाद्वारे सॉफ्टवेअर अॅनालिटिक्स, रोबोटिक्स, प्रोग्रामर, गेमिंग क्षेत्रात नोकऱ्या मिळू शकतात.

हे कोर्सेस करणं महत्त्वाचं 

कॉम्प्युटर सायन्स, आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम, पीजी प्रोग्राम इन मशीन लर्निंग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करण्यासाठी मुख्य कोर्स आहेत.

गुगल, फेसबुक आणि लिंक्डइनसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. येथे रोजगाराच्या अनेक संधी आहेत. स्मार्टफोनच्या धर्तीवर प्रत्येक उपकरण चालवण्यासाठी आता या फील्डची गरज आहे.

डॉ अमित आंद्रे, द डेटा टेक लॅबस
 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Helicopters Collide in Malaysia: नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Video : आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन!
Video : आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन!
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjog Waghere : श्रीरंग बारणेंचा पराभव निश्चित;संजोग वाघेरेंचा विश्वासNilesh Lanke Family : पैसे नसल्याने साध्या पद्धतीने अर्ज भरणार; निलेश लंकेंच्या वडिलांची प्रतिक्रीयाNilesh Lanke : कोणतंही शक्तीप्रदर्शन न करता, देवदर्शन घेऊन निलेश लंके भरणार उमेदवारी अर्जOmraje And Archana Patil :प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता तपासा; ओमराजे, अर्चना पाटील आयोगाच्या रडारवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Helicopters Collide in Malaysia: नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Video : आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन!
Video : आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन!
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
'प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा', ओमराजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर
'प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा', ओमराजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर
Lok Sabha Elections 2024 Election Commission: आम्ही रोखू पण, तुमचं काय? आचारसंहितेवरून दिग्दर्शकाचा  निवडणूक आयोगाला सवाल
आम्ही रोखू पण, तुमचं काय? आचारसंहितेवरून दिग्दर्शकाचा निवडणूक आयोगाला सवाल
ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकासाठी सौरव गांगुलीने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र; सलामीच्या जोडीचं नाव सुचवलं!
टी-20 विश्वचषकासाठी सौरव गांगुलीने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र; सलामीच्या जोडीचं नाव सुचवलं!
Premachi Goshta Serial Update : सईच्या कस्टडीसाठी सावनीने रचला नवा कट, सागर-मुक्ता येणार का एकत्र?
सईच्या कस्टडीसाठी सावनीने रचला नवा कट, सागर-मुक्ता येणार का एकत्र?
Embed widget