IPL Purple Cap 2022 : फिरकीपटू युजवेंद्र चहल अजूनही पर्पल कॅप शर्यतीत अव्वल, पण हे गोलंदाज देत आहेत तगडं आव्हान
IPL Purple Cap 2022 : यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या असून त्याच्याकडे पर्पल कॅप आहे. पण या यादीत आणखीही खेळाडू आहेत.
![IPL Purple Cap 2022 : फिरकीपटू युजवेंद्र चहल अजूनही पर्पल कॅप शर्यतीत अव्वल, पण हे गोलंदाज देत आहेत तगडं आव्हान IPL 2022 Latest Purple Cap lists in point table RRs Chahal having Purple cap IPL Purple Cap 2022 : फिरकीपटू युजवेंद्र चहल अजूनही पर्पल कॅप शर्यतीत अव्वल, पण हे गोलंदाज देत आहेत तगडं आव्हान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/4a68a142b6912e011bcb1ae3e192719e_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Purple Cap 2022 : आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामात राजस्थान संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) दमदार कामगिरी करत असून त्याने आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स नावावर केल्या आहेत. त्यामुळे पर्पल कॅपही त्याच्याकडेच आहेत. युझवेंद्रने यंदाच्या हंगामात 40 ओव्हर फेकत 7.27 च्या सरासरीने प्रति ओव्हर धावा देत 15.31 च्या बोलिंग एव्हरेजसह 19 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे सरासरी विचार करता प्रत्येक 15 रन दिल्यानंतर चहलने एक विकेट खिशात घातली आहे.
पर्पल कॅपच्या या शर्यतीत चहल टॉपवर असला तरी काही खेळाडू त्याला टक्कर देण्यासाठी शर्यतीत आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव, पंजाब किंग्सचा कागिसो रबाडा आणि सनरायजर्स हैदराबादचा टी नटराजन यांनी चांगली टक्कर दिली आहे. या तिघांनी देखील आतापर्यंत प्रत्येकी 17-17 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय रॉयल चँलेंजर्स बंगळुरुच्या वानिंदु हसरंगाने देखील 16 विकेट्स घेतल्याने तो पर्पल कॅपच्या शर्यतीत वेगात आहे.
यंदाच्या हंगामात टॉप कामगिरी करणारे गोलंदाज
क्रमांक | गोलंदाज | सामने | विकेट्स | गोलंदाजी अॅव्हरेज | इकनॉमी रेट |
1 | युझवेंद्र चहल | 10 | 19 | 15.31 | 7.27 |
2 | कुलदीप यादव | 9 | 17 | 15.82 | 8.23 |
3 | कागिसो रबाडा | 9 | 17 | 8.27 | 16.05 |
4 | टी नटराजन | 9 | 17 | 17.82 | 8.65 |
5 | वानिंदु हसरंगा | 11 | 16 | 19.00 | 8.21 |
हे देखील वाचा-
- RCB vs CSK, Top 10 Key Points : बंगळुरुचा चेन्नईवर 13 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- ICC Rankings: टी-20 मध्ये भारत नंबर वन! कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?
- IPL 2022 : लिव्हिंगस्टोनचा गुजरातविरुद्ध अफलातून षटकार; राशिदनं जाऊन चक्क लियामची बॅट तपासली, पाहा फोटो
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)