CSK Vs MI: चेन्नईचा पुष्पा धोनीसमोर झुकला! रवींद्र जाडेजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
CSK Vs MI: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 30 व्या सामन्यात चेन्नईच्या संघानं मुंबईला तीन विकेट्स राखून पराभूत केलं.
CSK Vs MI: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 30 व्या सामन्यात चेन्नईच्या संघानं मुंबईला (Chennai Super Kings, Mumbai Indians) तीन विकेट्स राखून पराभूत केलं. या विजयात महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या चार चेंडूत 16 धाव ठोकून धोनीनं चेन्नईला विजय मिळवून दिला. ज्यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या नावाची चर्चा रंगलीय. याचदरम्यान, चेन्नईचा कर्णधार रवींद्र जाडेजानं (Ravindra Jadeja) संघाला सामना जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला स्पेशल सेल्यूट केलं. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
मुंबईविरुद्ध सामन्यात महेंद्रसिंह धोनीनं दमदार कामगिरी करत मुंबईच्या तोंडातून विजयी घास हिसकावला. अखेरच्या चार चेंडूत चौकार- षटकारांचा वर्षाव करत धोनीनं संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर सामना जिंकून परतणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला रवींद्र जाडेजानं भरमैदानात स्पेशल सेल्यूट केलं.
अखेरच्या षटकात काय घडलं?
सामन्याच्या अखेरच्या षटकात चेन्नईच्या संघाला 6 चेंडूत 17 धावांची गरज होती. मात्र, या षटकातील पहिल्या चेंडूवर प्रिटोरियस बाद झाला. त्यानंतर चेन्नईला सामना जिंकून देण्याची संपूर्ण जबाबदारी धोनीच्या खांद्यावर आली. चेन्नईला विजयासाठी चार चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. जयदेव उनादकटच्या गोलंदाजीवर धोनीनं पहिला षटकार मारला, मग चौकार, त्यानंतर दोन धावा काढून त्यानं स्ट्राईक स्वत:जवळ ठेवली. अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज असताना धोनीनं चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला.
व्हिडिओ-
आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ कितव्या क्रमांकावर
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील चेन्नईचा दुसरा विजय आहे. चेन्नईच्या संघानं आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यापैकी पाच सामने गमावले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ नवव्या स्थानावर आहे. तर, सातही सामने गमावलेला मुंबईचा संघ गुणतालिकेच्या तळाशी आहे.