IPL 2022: बाबा! बटलरसारखं शतक का ठोकत नाहीत? डेव्हिड वार्नरच्या कामगिरीवर मुलगी नाराज
IPL 2022: आयपीएल 2022 च्या 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्जला 9 विकेट्स राखून पराभूत केलं.
IPL 2022: आयपीएल 2022 च्या 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्जला 9 विकेट्स राखून पराभूत केलं. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वार्नरनं 60 धावांची नाबाद खेळी केली. ज्यात 10 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. हे डेव्हिडचं सलग तिसरे अर्धशतक आहे. पंजाबविरुद्ध सामन्यानंतर वॉर्नरनं आपल्या मुलांबद्दल असे काही बोललं, ज्याची सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा होत आहे.
डेव्हिड वार्नर म्हणाला की, "मी फक्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत होतो आणि पृथ्वी शॉसोबत खेळताना मला आनंद होत आहे. मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, माझ्या मुलींना हे जाणून घ्यायचं आहे की, मी जोस बटलरसारखं का शतक करत नाहीत. जगभरातील मुलं आयपीएलची स्पर्धा पाहत आहेत, याचा आनंद वाटतो." हे लक्षात घेण्यासारखे आहे की, राजस्थान रॉयल्सचा खेळाडू जोस बटलर या हंगामात धमाकेदार फलंदाजी करत आहे आणि त्याने आतापर्यंत दोन शतके झळकावली आहेत.
दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकी गोलंदाजीपुढे पंजाबच्या संघाची पुरती तारांबळ उडाली. दिल्लीच्या फरकी गोलंदाजांनी आधी पंजाबच्या फलंदाजांना अडकवले, त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी पंजाबच्या गोलंदाजांना धू धू धुतले. बुधवारी झालेल्या एकतर्फी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 9 गड्यांनी पराभव केला. दिल्लीच्या गोलंदाजांनी पंजाबला 115 धावांवर रोखलं. त्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांनी हे आव्हान 58 चेंडू आणि 9 गडी राखून सहज पार केले.
हे देखील वाचा-
- AB de Villiers On Dinesh Karthik: एबी डिव्हिलियर्सला पुन्हा क्रिकेट खेळायचंय! दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून झाला प्रभावित, म्हणतोय...
- Harbhajan Singh On MI Vs CSK: मुंबई-चेन्नईचा सामना म्हणजे भारत-पाकिस्तानचा महामुकाबला- हरभजन सिंह
- MI vs CSK: मुंबईविरुद्ध सामन्यापूर्वी चेन्नईला मोठा धक्का, 'करो या मरो'च्या सामन्यात 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही