एक्स्प्लोर
Sangli Crime : सहा तलवारी, कोयता असा घातक शस्त्रसाठा जप्त, गुन्हे अन्वेषण विभागाचा पथकाचा छापा
Sangli Crime : सांगलीत सहा तलवारी, कोयता असा घातक शस्त्रसाठा बाळगून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलीय. रोहित कुसाळकर असे या संशयित व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून सहा तलवारी आणि एक कोयता जप्त केला गेलाय . सांगलीतील नवीन वसाहत रोडवरील ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या तरुणाकडून सहा तलवारी आणि एक कोयता असा एकूण ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
आणखी पाहा























