Mumbai Central Line Mega Block Over : मध्य रेल्वेवरील ब्लॉक उशिराने संपल्यानं प्रवाशांना फटका, कर्नाक ब्रिजचं काम 5 तास उशिरानं संपलं
Mumbai Central Line Mega Block Over : मध्य रेल्वेवरील ब्लॉक उशिराने संपल्यानं प्रवाशांना फटका, कर्नाक ब्रिजचं काम 5 तास उशिरानं संपलं
मध्य रेल्वेवरची वाहतूक आता सुरू झालीय.
कर्नाक ब्रिजचा गर्डरच्या कामामुळे घेण्यात आलेला ब्लॉक ५ तास लांबल्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल झाले..
सकाळी साडेदहा वाजल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली,,
दरम्यान या कर्नाक पुलाचं काम अर्धवट असून आता काम बंद केलंय..
माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.15 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार वळवण्यात येतील, पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
डाऊन जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.10 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3.39 वाजता सुटेल. अप जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.10 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सायंकाळी 4.44 वाजता पोहोचेल.