एक्स्प्लोर

Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य

Manikrao Kokate : कृषी आयुक्तांच्या समितीने राज्य सरकारला पिक विमा योजना योजना बंद करण्याची शिफारस केली आहे. याबाबत माणिकराव कोकाटेंनी मोठं वक्तव्य केलंय.

Manikrao Kokate : राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या काळात एक रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेला सर्वसमावेशक पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) हे नाव देण्यात आले. यात केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरला जायचा.  शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरुन अर्ज पीक विम्याचा अर्ज दाखल करता येत होता. मात्र, या योजनेत गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. यानंतर कृषी आयुक्तांच्या समितीने सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली आहे. आता याबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. 

माणिकराव कोकाटे यांनी रविवारी (दि.26) नंदुरबार येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. पिक विमा योजना बंद होणार का? याबाबत विचारले असता राज्यात पिक विमा योजना ही बंद होणार नाही आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे. यात काही बदल केले जाणार आहेत, अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.  राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली आहे. काही ठिकाणी चौकशी सुरू आहे. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

...म्हणून एसटी महामंडळ तोट्यात 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एसटीच्या भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार एसटीच्या भाड्यात 14.95 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबत विचारले असता एस टी महामंडळाच्या भाडेवाढीबाबत अजून कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला नाही. कॅबिनेटमध्ये हा निर्णय होईल त्यानंतर शिक्कामोर्तब केले जाईल. एस टी महामंडळ सध्या तोट्यात आहे. सरकारने महामंडळात अनेक योजना सुरू केल्यामुळे महामंडळ तोट्यात आहे, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.  

नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत काय म्हणाले कोकाटे? 

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. नाशिकमधून गिरीश महाजन आणि रायगडमधून अदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, हा निर्णय स्थगित करण्यात आला. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर या विषयावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री आल्यानंतर दोन-चार दिवसात नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

आणखी वाचा 

गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार आहे का? कृषीमंत्री संतापले, म्हणाले, पीक विमा योजनेत होणारे गैरप्रकार रोखणार 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cotton Trade : खान्देशातील जिनिंग व्यवसाय मोठ्या संकटात; बांगलादेश-अमेरिका करारामुळे अडचणी वाढण्याची भीती
खान्देशातील जिनिंग व्यवसाय मोठ्या संकटात; बांगलादेश-अमेरिका करारामुळे अडचणी वाढण्याची भीती
दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! आता माणसाप्रमाणे शेतीलाही मिळणार आधार कार्ड, जमिनींसाठीचे वाद कमी होणार?
दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! आता माणसाप्रमाणे शेतीलाही मिळणार आधार कार्ड, जमिनींसाठीचे वाद कमी होणार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 22 वा हप्ता कधी मिळणार? 'या' शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी!  PM किसानचा 22 वा हप्ता कधी मिळणार? 'या' शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये
Akola Pattern In Cotton : कापूस धोरणाचा पाया ‘सघन कापूस लागवड पद्धत’; भारताला शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा 'अकोला पॅटर्न' नेमकं काय?
कापूस धोरणाचा पाया ‘सघन कापूस लागवड पद्धत’; भारताला शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा 'अकोला पॅटर्न' नेमकं काय?

व्हिडीओ

Sanjay Raut On Eknath shinde : शिंदेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला
Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: दोन वर्षांचा चिमुकला खेळत असतानाच अनर्थ घडला, घराची भिंत अचानक अंगावर कोसळली अन्...; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
दोन वर्षांचा चिमुकला खेळत असतानाच अनर्थ घडला, घराची भिंत अचानक अंगावर कोसळली अन्...; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
Epstein Files: व्यावसायिक, राजकारणी अन् बँकर्स! एपस्टीनशी संबंध उघड होताच जगभरात राजीनाम्यांची लाट सुरूच; आता आणखी एका अब्जाधीशाचा राजीनामा; आतापर्यंत 10 देशांत नाव येताच पदावर पाणी सोडलं
व्यावसायिक, राजकारणी अन् बँकर्स! एपस्टीनशी संबंध उघड होताच जगभरात राजीनाम्यांची लाट सुरूच; आता आणखी एका अब्जाधीशाचा राजीनामा; आतापर्यंत 10 देशांत नाव येताच पदावर पाणी सोडलं
Bhigwan Kidnapping Case: पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापडलं नाही
पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापडलं नाही
Sundar Pichai: AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
Bhiwandi Mahangarpalika Election 2026: भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Gold Silver Rates Today: सोने -चांदी आवाक्याबाहेरच! पुन्हा दर वाढले, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? भाववाढीची  कारणे काय?
सोने -चांदी आवाक्याबाहेरच! पुन्हा दर वाढले, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? भाववाढीची  कारणे काय?
Galgotias University AI Summit Dog:आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
Rohit Pawar and Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
Embed widget