Pune : Chandani Chowk पुलावरील वाहतूक थांबवली, पूल पाडण्याची तयारी सुरु
पुण्याच्या चांदणी चौकातील पुल पाडण्याची तयारी सुरु झालीय. त्यासाठी पुलाच्या भिंतींमधे जी स्फोटकं भरावी लागणार आहेत त्यासाठी पुलाच्या भिंतींना ड्रीलींग करुन होल्स पाडण्याच काम सुरु झालय. स्फोटानंतर अवघ्या आठ दे दहा सेकंदांमधे हा पुल जमिनदोस्त होणार आहे. पण त्यानंतर जो राडारोडा तयार होणार आहे तो हटवण्यासाठी आठ ते दहा तास लागणार आहेत. या कालावधीत मुंबईहून- पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता द्यावा लागणार आहे. नवीन उड्डाणपूलाची पाषाण- बावधन कडे लेन तयार झालेली असली तरी जुना पुल पाडण्यासाठी मुंबईहून- पुण्याकडे येणाऱ्या महामार्गास एन एच ए आय ला पर्याय उपलब्ध करून द्यावा लागणार आहे आणि त्याला वेळ लागण्याची शक्यताय.























