Ganesh Visarjan 2022 : मुंबईत बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष, तर पुण्यातही उत्साह साजरा
मुंबईत बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष आज सुरु झालाय.... ढोलताशांचा गजर.... त्यावर बेभान होऊन नाचणारे भक्त.... गुलालांची उधळण.... बाप्पावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी..... मुंबईच्या लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीत दिसणारं हे दृश्य दोन वर्षांनी पुन्हा अनुभवायला मिळत आहे.... बाप्पांचा जयघोष करत गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची मिरवणूक सकाळीच सुरु झालीय. तर लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज आहे... मुंबईप्रमाणेच पुण्यातही विसर्जन मिरवणुकांची तयारी सुरु आहे.... ढोलपथकं, रस्तोरस्ती काढलेल्या रांगोळ्या आणि गणरायांचे रथ.... पुण्यात पारंपरिक मिरवणुकीसाठी गणेशभक्त सज्ज झालेत



















