Ajit Pawar : कलाटेंच्या बंडखोरीमुळे चिंचवड निवडणुकीच्या निकालाला कलाटणी
पुण्यातल्या कसबा पेठेत मविआनं भाजपला धक्का दिला असला तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघ आपल्याकडेच कायम राखण्यात भाजपला यश आलं आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी ही पोटनिवडणूक जिंकली आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या चिंचवड मतदारसंघात रविवारी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्या निवडणुकीत अपेक्षेनुसार भाजपच्या अश्विनी जगतापांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांचा हा विजय मविआचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळं सुकर झाला. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा लाभलेले राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे यांच्या मतांची बेरीज ही अश्विनी जगतापांपेक्षा अधिक होताना दिसते. त्यामुळं कलाटे यांनी केलेली बंडखोरी मविआला धक्का देणारी ठरली.























