एक्स्प्लोर
MNS Mira Bhayander Morcha: 50 खोकेच्या घोषणा, बॉटलही भिरकावली, 5 मिनिटांत निघावं लागलं; प्रताप सरनाईक मोर्चात पोहचताच काय घडलं?
MNS Mira Bhayander Morcha: मीराभाईंदरमधील मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रताप सरनाईकांना मोठ्या नामुष्कीला तोंड द्यावं लागलं.
MNS Mira Bhayander Morcha
1/8

MNS Mira Bhayander Morcha: मीरारोडमध्ये अखेर मनसे आणि शिवसेनेचा मोर्चा निघाला. तीन तासांच्या राड्यानंतर अखेर हा मोर्चा काढण्यात आला. (Photo Credit- ABP Majha)
2/8

विशेष म्हणजे ज्या मार्गावरून मोर्चा काढण्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यातच मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. (Photo Credit- ABP Majha)
3/8

मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रताप सरनाईकांना मोठ्या नामुष्कीला तोंड द्यावं लागलं. (Photo Credit- ABP Majha)
4/8

प्रताप सरवाईना मोर्चेकऱ्यांनी अक्षरशः मोर्चातून हुसकावून लावलं, त्यांच्यासमोर पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. (Photo Credit- ABP Majha)
5/8

मी मराठी अशी डोक्यावर टोपी घालून प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी झाले. मात्र प्रताप सरनाईक दाखल होताच त्यांच्या दिशेने बॉटलही भिरकावल्याचे पाहायला मिळाले. (Photo Credit- ABP Majha)
6/8

प्रताप सरनाईक सकाळी मुंबईतील पावसाळी अधिवेशनात दाखल झाले होते. मात्र मीरा भाईंदरमध्ये आंदोलन चिघळताच प्रताप सरनाईकांनी मी देखील मोर्चात सहभागी होतोय, अशी घोषणा केली. (Photo Credit- ABP Majha)
7/8

मुंबईवरुन मीरा-भाईंदरच्या दिशेने प्रताप सरनाईक निघाले. मात्र मीराभाईंदरमधील मोर्चास्थळी दाखल होताच 5 मिनिटांत काढता पाय घ्यावा लागला. (Photo Credit- ABP Majha)
8/8

दरम्यान, प्रताप सरनाईक यांचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मी जेव्हा मीरा भाईंदरच्या हद्दीत प्रवेश करतो, तेव्हा माझ्या तोंडून हिंदीच निघते, असे सरनाईक यांनी त्या व्हिडिओत म्हटल्याचे दिसून येते. त्यामुळे, मराठी एकीकरणासाठी निघालेल्या या मोर्चातील आंदोलकांनी प्रताप सरनाईक यांच्या सहभागाला थेट विरोध दर्शवल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली. (Photo Credit- ABP Majha)
Published at : 08 Jul 2025 02:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























