IND vs ENG 3rd Test Day 4 Live : लॉर्ड्सवर थरार शिगेला! इंग्लंडचा थरारक कमबॅक, भारताची दुसरी इनिंग अडचणीत, 4 खेळाडू OUT! शेवटचा दिवस ठरणार निर्णायक
England vs India 3rd Test Lord's Update : लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे.
LIVE

Background
India vs England, 3rd Test, Day 4, Live Score: इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. आज तिसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस असून खेळाला सुरुवात झाली आहे. सध्या इंग्लंडचा दुसरा डाव सुरु झाला आहे. इंग्लंड फलंदाजी करतोय, त्यामुळे भारताला विजयासाठी नेमकं किती आव्हान देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काल तिसऱ्या दिवस अखेर मैदानावर मोठा ड्रामा पाहायला मिळाला. साहजिक जास्त षटकं होऊ नये म्हणून इंग्लंडचा संघ रडीचा डाव खेळणार याची अपेक्षा होती. पण यामुळे मैदानावर मोठा वाद झाला. भारताचे 10 खेळाडू क्रॉलीच्या जवळ गेले. तसेच मोहम्मद सिराज, नितीश रेड्डी, केएल राहुल, करुण नायर, रवींद्र जडेजा कर्णधार शुभमन गिलसह इंग्लंडच्या फलंदाजाला भिडताना दिसले. त्यामुळे आज देखील भारतीय संघ आक्रमकपणे मैदानात उतरेल. दरम्यान, पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत भारत आणि इंग्लंडची 1-1 अशी बरोबरी आहे.
लॉर्ड्सवर थरार शिगेला! इंग्लंडचा थरारक कमबॅक, भारताची दुसरी इनिंग अडचणीत, 4 खेळाडू OUT! शेवटचा दिवस ठरणार निर्णायक
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा चौथा दिवस संपला आहे. रविवारी खेळ संपेपर्यंत भारताने चार विकेट गमावून 58 धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी 135 धावांची आवश्यकता आहे. इंग्लंड आणि भारताचा पहिला डाव 387 धावांवर संपला. दुसऱ्या डावात इंग्लंड संघाने 10 विकेट गमावून 192 धावा केल्या आणि भारताला 193 धावांचे लक्ष्य दिले. दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, केएल राहुल 47 चेंडूत सहा चौकारांसह 33 धावा करत खेळत आहे.
भारताला मोठा धक्का! कर्णधार शुभमन गिल OUT
भारताला तिसरा धक्काही ब्रायडन कार्सने दिला. त्याने कर्णधार शुभमन गिलला एलबीडब्ल्यू आउट केले. तो फक्त सहा धावा करू शकला.




















