एक्स्प्लोर
Ajit Pawar Hinjawadi | वाहतूक कोंडीवर कडक आदेश, 'टायरमध्ये घालून मारा' आणि अंधश्रद्धेवरही बोलले!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे सहा वाजल्यापासून हिंजवडीतील आयटी पार्क परिसरात विविध समस्या सोडवण्यासाठी दौरा केला. रस्त्याच्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर थेट लक्ष देण्यासाठी अजित पवार रस्त्यावर उतरले. सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३५३ नुसार गुन्हे दाखल करून त्यांना उचलण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी पीएमआरडीए आणि संबंधित प्रशासनाला दिले. रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले. तसेच, रॉंग साईडने जाणाऱ्यांना 'टायरमध्ये घालून मारा' असे थेट आदेशही त्यांनी दिले. अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत दम भरल्याचे दिसून आले. त्यांनी सांगितले की, "आजिबात नियम कुणी तोडू नका मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवाराचा कुणी अंकिन, नातेवाईक असो." त्यांनी पूजा अर्चा आणि अंधश्रद्धेवरही आपले विचार मांडले. "ज्याचा स्वतवर विश्वास नसतो तो बोलतो देवा पावरे पाव. अरे तू काम केले तर देव पावणारच आहे. जे काही आहे हे अंधश्रद्धा आहे," असे ते म्हणाले. स्वतःच्या मालकीची जागा असलेल्यांना टीडीआर देण्याचे किंवा नुकसान भरपाई देण्याचे त्यांनी स्पष्ट केले, परंतु सरकारी मालकीच्या रस्त्यासाठी परत पैसे देण्याचा संबंध नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
सगळे कार्यक्रम
Majha Vishesh

Aaditya Thackeray Majha Vision | दिल्लीतील बहिण अजूनही लाडक्या, महाराष्ट्र अजून हफ्ता वाढ नाही

Aftab Poonawalla - Shraddha Walkar Special Show : प्रेम, लिव्ह इन आणि व्यवस्थेचे बळी - माझा विशेष

Majha Vishesh : माझा विशेष : 'हॅलो' चा इतिहास, 'Hello विरुद्ध Vande Mataram वरुन राजकारण : Abp Majha

12 MLA Suspension : Supreme Court Vs राज्य सरकार संघर्ष सुरु राहणार? आमदारांना एंट्री मिळणार का?

ABP Majha Vishesh : CET नाही मग अकरावीचे प्रवेश कसे? वाढलेल्या टक्केवारीमुळे कट ऑफ लिस्टचं काय?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

























