एक्स्प्लोर
Jalgaon News : जळगावात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, पोलीस अन् आंदोलकांमध्ये जोरदार धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?
Jalgaon News : जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.
Jalgaon News
1/8

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून इंदौर-हैदराबाद मार्गासाठी 160 शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या आहेत.
2/8

शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळाला नसल्याने आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
3/8

यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी धक्काबुक्की झाल्याचे दिसून आले.
4/8

या धक्काबुक्कीत काही आंदोलक अत्यवस्थ झाले.
5/8

त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
6/8

आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
7/8

जीव गेला तरी बेहत्तर, मात्र शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर आम्ही मागे हटणार नाही, असा थेट इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे.
8/8

आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत. मात्र, त्यासाठी आम्हाला पुरेसा मोबदला मिळायला हवा. मात्र, तो सरकारच्या वतीने मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह मला आंदोलन करण्याची वेळ आली, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
Published at : 13 Jul 2025 01:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























