Gadchiroli Bridge | तेलंगणा राज्यात जाण्यासाठी भव्य पुलाची निर्मिती, दक्षिण गडचिरोलीकरांना दिलासा
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनही नीट रस्ते नाहीत, नदी-नाल्यांवर पूल नाही गावात अजून वीज पोहोचली नाही, शासनाचे दावे आणि योजना कागदावरच आहेत दक्षिण गडचिरोली भागाला लागून तेलंगणा आणि छत्तीसगढ राज्याच्या सीमा आहेत आणि दोन्ही सीमेच्या मध्ये गोदावरी, प्राणिता आणि इंद्रावती या नद्या एकत्र येतात आणि दक्षिण गडचिरोली भागातून तेलंगणा राज्यात जाण्यासाठी एक तर या नदीच्या पात्रातून लाकडी नावेच्या सहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागायचा नाहीतर चंद्रपूर जिल्ह्यातून 200 किलोमीटरचा पट्टा गाठावा लागायचा. प्राणिता नदीवरील महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर पुलाचं काम करण्यास तेलंगणा सरकारने आता पुढाकार घेतला आहे. प्राणिता नदीवर भव्य पुलाच्या कामाला सुरुवात केली आहे. दोन वर्षात 100 कोटी खर्चून हा पूल बनवून तयार झाला. आता अंतिम रंगरंगोटीचं काम शेवटच्या टप्प्यात आहे.