एक्स्प्लोर

Horoscope Today 8 March 2026 : आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा होणार परिणाम? कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 8 March 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 8 March 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 8 मार्च 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस हा सूर्यदेवाला (Lord Sun) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. जल अर्पण केलं जातं. आज जागतिक महिला दिन देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवशी स्त्री शक्तीवर आधारित अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. नारीशक्तीचा जागर करण्यात येतो. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मकतेचा असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, भाषेवर तुमचं चांगलं प्रभुत्व पाहायला मिळेल. तुम्ही भविष्यासाठी आखलेल्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. शुभ कार्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या कामात तुमची प्रगती दिसून येईल. पण, अनेकजण तुमचे पाय ओढतील. मात्र, तुमच्या ध्येयावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. अनेक नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील त्याचा स्वीकार करा. वाणीत स्पष्टता महत्त्वाची आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे दार खुले होतील. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. मुलांसाठी आजचा दिवस सुट्टीचा असल्या कारणाने ते आनंदात आजचा दिवस घालवतील. धार्मिक यात्रेला जाण्यासाठी आजचा दिवस शुभकारक आहे. सामाजिक कार्यात तुम्ही जास्त लक्ष द्याल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुमच्यापाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा असताना तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. वैवाहिक जीवन सुखाचे जातील. आज संध्याकाळच्या वेळी पार्टनरला छान भेटवस्तू द्याल. तसेच, तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही दिग्गज लोकांची मदत मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला फार प्रवास करावा लागेल. या दरम्यान अनेक लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही इतके दिवस थांबून होता ते काम तुमचं वेळेत पूर्ण होईल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, सामाजत तुमच्या नावाचं कौतुक केलं जाईल. प्रगतीचे अनेक संकेत निर्माण होणार आहेत.  

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. पण, तुम्ही हाती घेतलेल्या कार्याने अनेकांना रोजगार मिळेल. त्यामुळे व्यवहारात फक्त स्वत:चाच विचार न करता इतरांचा देखील विचार करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईल. मात्र, दिवसाच्या शेवटी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. भविष्यात तुम्ही प्लॅन केलेल्या योजनांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच, तुमचा आत्मविश्वासही ढासळेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमची अनेक रखडलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या हाती चांगली बातमी लागेल. लवकरच एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. प्रवासाचे योग आहे. फक्त आळस दूर ठेवा. यश तुमचंच आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांचा Sixth Sense असतो स्ट्राँग; भविष्यातील घटनांची आधीच चाहूल लागते, 90 टक्के अंदाज ठरतात खरे

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget