Uran Dawood Shaikh Arrested : Yashashree Shinde हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला अटक
रायगड : जिल्ह्यातील उरण येथील 22 वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तो कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथे असल्याच पोलिसांना समजले होते. नवी मुंबईच्या पोलिसांनी तशी माहिती दिली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे उरणमधील तरुणीच्या हत्याप्रकर अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
कर्नाटकमधून घेतलं ताब्यात
उरण हत्याकांड समोर आल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद फरार होता. त्याचा नेमका ठावठिकाणा कोणालाही माहिती नव्हता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. पण पोलिसांना त्याचे नेमके ठिकाण समजत नव्हते. पण पोलिसांना शेवटी त्याला पकडण्यात यश आले आहे. कर्नाटकमधून सकाळी सात वाजता त्याला ताब्यात घेण्यात आलंय.
यापूर्वी या प्रकरणाशी निगडीत एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात आरोपी दाऊद मृत तुरणीचा पाठलाग करत असल्याचे कैद झाले आहे. पोलिसांनी दाऊतला कर्नाटकमधील गुलबर्गा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्याकांडानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
दाऊद शेखचा शोध कसा लागला?
25 जुलै रोजीचे एकूण दोन सीसीटीव्ही समोर आले आहेत. यात आरोपी दाऊद शेख मृत तरुणीचा पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीचा मृतदेह उरणच्या खाडीत सापडला होता. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुंटबीयांनी पोलिसांकडे नोंदवली होती. प्राप्त तक्रारीनंतर पोलिसांनी उरणमध्ये मिळालेल्या मृतदेहाची तपासणी केली आणि मृत तरुणीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर हे प्रत्याप्रकरण समोर आले होते.