Nagpur मध्ये पावसामुळे विमानतळाजवळ पाणी साचलं, काही रस्त्यांना नदीचं स्वरुप : ABP Majha
फक्त सव्वा तास झालेल्या दमदार पावसाने नागपूरच्या काही रस्त्यांनाच नदीचे स्वरूप दिले नाही... तर अनेक कार्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यामुळे कार्यालयांच्या आत तलावा सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे... नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनला मॉडेल पोलीस स्टेशन म्हणून विकसित करण्यात आले होते, त्या सोनेगाव पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले असून वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर तर अक्षरशः झरा वाहतो अशा स्वरूपात पाणी वाहत आहे... पोलिसांची वायरलेस रूम असो किंवा पोलीस निरीक्षकांची केबिन सर्वत्र पाणी शिरल्यामुळे वाहतूक शाखेचे कर्मचारी आपल्या कार्यालयाच्या बाहेर बसून काम करण्यास मजबूर झाले आहे























