एक्स्प्लोर

Sunil Patil Interview : सुनील पाटील यांनी 2016 पर्यंत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याची दिली कबूली

Mumbai Drugs Case Exclusive : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सॅम डिसुझा आणि मोहित कंबोज यांनी ज्याच्यावर आरोप केले होते त्या सुनिल पाटील यांनी एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. आर्यन खान केस प्रकरणाशी आपला काही संबंध नाही, आपण फक्त यामध्ये 50 लाखाची डील केली होती असा गौप्यस्फोट सुनिल पाटील यांनी केला. मनिष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा हेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा सुनिल पाटील यांनी केला आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी सुनील पाटील हे मास्टरमाईंड असून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचा कार्यकर्ता आहे, अनिल देशमुखांच्या मुलाशी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध आहेत, असा दावा कंबोज यांनी केला होता.

सुनिल पाटील म्हणाले की, "किरण गोसावी याला आपण 22 सप्टेंबरला पहिल्यांदा भेटलो.  27 तारखेला मनिष भानुशाली यांच्यासोबत मी अहमदाबादला गेलो. ड्रग्ज प्रकरणी मला टीप मिळाली नव्हती तर ती मनिष भानुशालीला मिळाली होती. निरज यादव हा मध्य प्रदेशमधील भाजपचा कार्यकर्ता असून त्याने आपल्याशी संबंध साधला होता. सॅम डिसुझाला चार महिन्यापूर्वी एका ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने समन्स पाठवलं होतं. त्यावेळी त्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना 25 लाख रुपये देणार असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर तो या प्रकरणातून सुटला."

सुनिल पाटील म्हणाले की, "हे प्रकरण मला माहित असल्याने मी सॅम डिसुझाचा नंबर दिला. मी त्यावेळी अहमदाबादला असल्याने मला काही जास्त माहिती नाही. या प्रकरणी किरण गोसावी आणि मनिष भानुशाली यांनी 50 लाखांचं टोकण मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सॅमचा मला फोन आला आणि ही डील रद्द केली असल्याची माहिती दिली आणि पैसे परत घेत असल्याचं सांगितलं."

कोण आहेत सुनील पाटील?
सुनील पाटील हे धुळ्याचे रहिवाशी असल्याची माहिती आहे. ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे.  बबनराव पाचपुते जेव्हा 2009 ते 2014 मध्ये NCP मधून आमदार होऊन कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यावेळी ते त्यांच्या बंगल्यावर नेहमी दिसायचे असं सांगितलं जातं.

भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालेल्या शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांच्याशी देखील सुनील चौधरी पाटील यांची जवळीक होती. मात्र नंतर मेटेंशी काही वाद झाल्यानं त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. सुनील पाटील यांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंध आहेत असा आरोप केल्यानंतर आता सुनील पाटील यांचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुनील पाटील भाजपचे गुजरातचे मंत्री किरीट सिंह राणा यांच्या सोबत आहे तर दुसऱ्या फोटो मध्ये मनीष भानुशाली आणि सुनील पाटील एकत्र दिसतायंत. 

मुंबई व्हिडीओ

Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांच्या 'त्या' वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल
Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांच्या 'त्या' वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dubai floods : दुबईची तुंबई का झाली; कृत्रिम पाऊस अंगलट आला की हवामान बदलाने दणका दिला? नेमकं काय घडलं??
दुबईची तुंबई का झाली; कृत्रिम पाऊस अंगलट आला की हवामान बदलाने दणका दिला? नेमकं काय घडलं??
''भाषण सुरू होताच उमेदवार खाली जाऊन बसले''; जयंत पाटलांनी काढला चिमटा
''भाषण सुरू होताच उमेदवार खाली जाऊन बसले''; जयंत पाटलांनी काढला चिमटा
Harshvardhan Patil: फडणवीसांनी समजूत काढल्यानंतर बारामतीत हर्षवर्धन पाटील सक्रिय; सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी 300 गाड्या घेऊन पुण्यात
फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील ॲक्शन मोडमध्ये, सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी 300 गाड्या घेऊन पुण्यात
Kishori Pednekar : कथित बॉडीबॅग घोटाळ्यात ठाकरे गटाच्या किरोशी पेडणेकरांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
कथित बॉडीबॅग घोटाळ्यात ठाकरे गटाच्या किरोशी पेडणेकरांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

Madha Lok Sabha Aniket Deshmukh : माढामधून डॉ.अनिकेत देशमुख अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारAmol Kolhe LokSabha Election : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज दाखलAmit Shah On Loksabha : नरेंद्र मोदी 400 पार करून पुन्हा पंतप्रधान होणार, अमित शहांना विश्वासPune Supriya Sule : प्रचाराचा धडाका, मविआकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dubai floods : दुबईची तुंबई का झाली; कृत्रिम पाऊस अंगलट आला की हवामान बदलाने दणका दिला? नेमकं काय घडलं??
दुबईची तुंबई का झाली; कृत्रिम पाऊस अंगलट आला की हवामान बदलाने दणका दिला? नेमकं काय घडलं??
''भाषण सुरू होताच उमेदवार खाली जाऊन बसले''; जयंत पाटलांनी काढला चिमटा
''भाषण सुरू होताच उमेदवार खाली जाऊन बसले''; जयंत पाटलांनी काढला चिमटा
Harshvardhan Patil: फडणवीसांनी समजूत काढल्यानंतर बारामतीत हर्षवर्धन पाटील सक्रिय; सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी 300 गाड्या घेऊन पुण्यात
फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील ॲक्शन मोडमध्ये, सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी 300 गाड्या घेऊन पुण्यात
Kishori Pednekar : कथित बॉडीबॅग घोटाळ्यात ठाकरे गटाच्या किरोशी पेडणेकरांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
कथित बॉडीबॅग घोटाळ्यात ठाकरे गटाच्या किरोशी पेडणेकरांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
बुमराह, सूर्या की रोहित, अर्शदीप, कुणाला कॅप्टन कराल? PBKS vs MI सामन्यात मालामाल करणारे 11 खेळाडू 
बुमराह, सूर्या की रोहित, अर्शदीप, कुणाला कॅप्टन कराल? PBKS vs MI सामन्यात मालामाल करणारे 11 खेळाडू 
दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात अन् बायकोला घालतात, पाकीटमार कधीतरी पकडला जातो; आव्हाडांची अजितदादांवर टीका
दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात अन् बायकोला घालतात, पाकीटमार कधीतरी पकडला जातो; आव्हाडांची अजितदादांवर टीका
Telly Masala :  मकरंद अनासपुरे CM झाल्यास कोणता निर्णय घेणार ते कलर्स मराठीवरील ही मालिका जाणार ऑफएअर; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
मकरंद अनासपुरे CM झाल्यास कोणता निर्णय घेणार ते कलर्स मराठीवरील ही मालिका जाणार ऑफएअर; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
IPL 2024: ऑरेंज कॅप स्पर्धेत कोहलीच किंग, पर्पल कॅपची लढत रोमांचक 
IPL 2024: ऑरेंज कॅप स्पर्धेत कोहलीच किंग, पर्पल कॅपची लढत रोमांचक 
Embed widget