Abdul Sattar यांच्याकडून Eknath Shinde यांच्या खासजी सचिवांना शिविगाळ? काय आहे प्रकरण?
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच मंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती मिळतेय.. शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात होती, त्यावेळी त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येत होता. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्य खासगी सचिवाला शिवीगाळ केल्याची माहिती मिळतेय... विकास कामांचा आढावा घेताना रखडलेल्या कामांमुळे सत्तार संतापले. रागाच्या भरात सत्तारांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाला शिवीगाळ केल्याचं बोललं जातंय.. या वादानंतर काही मंत्री आणि शिंदे गटातील खासदार, आमदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. हा विषय नंतर सोडवता येईल असं म्हणत सत्तारांना समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र सत्तार रागातच बैठकीतून बाहेर पडले... सत्तारांच्या या वागणुकीमुळे मुख्यमंत्री शिंदे सत्तारांवर नाराज असल्याची चर्चा आहे.