Mahayuti Mumbai Seats Conflict : महायुतीत मुंबईतील जागांबाबत बैठकीनंतरही तिढा कायम
Mahayuti Mumbai Seats Conflict : महायुतीत मुंबईतील जागांबाबत बैठकीनंतरही तिढा कायम
हेही वाचा :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या डायरी ऑफ होम मिनिस्टर (Diary of Home Minister) या पुस्तकातील चार पानं ट्विट करत अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात होणाऱ्या ईडीच्या कारवाया या देवेंद्र फडणवीस यांच्याच सूचनेनुसार होत होत्या, हे सुचित करण्याचा पुस्तकातून प्रयत्न केला गेलाय. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्तीय म्हणून समित कदम नावाचा एक व्यक्ती सातत्याने मला भेटत होता आणि देवेंद्र फडणवीस यांचे सर्व निरोप मला सांगत होता, असाही पुस्तकात उल्लेख केला आहे. या सोबतच पुस्तकातून महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे प्लान रचला याचा देखील अनिल देशमुख यांच्याकडून उल्लेख करण्यात आला आहे. डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकातील चार पानं ट्विट करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये नव्याने वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे, अनिल परब, उद्धव ठाकरे यासोबतच पार्थ पवार यांना अडकवण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून समीत कदम हा व्यक्ती माझ्याकडे एक प्रतिज्ञापत्र घेऊन आला होता. त्यामध्ये आदित्य ठाकरे, अनिल परब, उद्धव ठाकरे यासोबतच पार्थ पवार यांना अडकवण्याचा डाव असल्याचाही यात उल्लेख करण्यात आला आहे. दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरे, 100 कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे, दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब आणि राज्यातील गुटखा व्यवसायिकांकडून वसूली करण्याचा प्रकरणात पार्थ पवार सहभागी असल्याचा प्रतिज्ञापत्रातून उल्लेख करण्यात आल्याचा अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केला आहे. संबंधित प्रतिज्ञापत्रावर सही न केल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी ईडी आणि सीबीआयच्या मार्फत आपल्यावर कारवाई घडवून आणण्याचा देखील पुस्तकातून उल्लेख करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ॲाफ होम मिनिस्टर’ पुस्तकातील काही पानं आज ट्वीट करण्यात आलीय. त्यातून हे खळबळजनक आरोप अनिल देशमुख यांनी केले आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारचं काय होणार होतं, भाजपाला त्यांना कसं अडकवायच होतं? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध कोणता कपटी डाव रचला गेला?