Shrinivas Vanga : श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं अन् ...
Shrinivas Vanga : पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाकारण्यात आल्यांनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी शिंदेंनी फसवलं असल्याचं म्हटलं होतं.
पालघर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पालघर विधानसभेचं तिकीट विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी राजेंद्र गावित यांना देण्यात आलं. यानंतर श्रीनिवास वनगा यांना धक्का बसला आहे. मी प्रामाणिक असताना मी प्रामाणिकपणे काम करत असताना सर्वांनी ठरवून माझी उमेदवारी डावलली त्यामुळे माझा ह्या सर्वांनी घात केला असल्याची टीका श्रीनिवास वनगा यांनी केली होती. उमेदवारी नाकाराल्यानंतर धक्का बसलेल्या श्रीनिवास वनगा यांचे रडतानाचा व्हिडीओ समोर आला होता. श्रीनिवास वनगा यांनी उद्धव ठाकरे माझ्यासाठी देव आहेत त्यांची मला माफी मागायची आहे असं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं. उद्धव ठाकरे यांनी देखील श्रीनिवास वनगा यांचे व्हिडीओ पाहून जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांना त्यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं. मात्र, पंकज देशमुख आणि श्रीनिवास वनगा यांची भेट होऊ शकली नाही. पंकज देशमुख यांनी श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांची भेट त्यांना धीर दिला.
ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी श्रीनिवास वनगांच्या भेटीला
पंकज देशमुख म्हणाले की, श्रीनिवास वनगा हे रडत असल्याच्या बातम्या आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहिल्या. ठाकरे यांनी आम्हाला त्यांची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी पाठवलं असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वसई जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे .
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वीच वनगा कुटुंबीयांची भेट घेतली . श्रीनिवास वनगा हे घरी नसले तरी त्यांच्या पत्नीशी चर्चा करत त्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्याचा आमचा प्रयत्न असून उद्धव ठाकरे हे आमचे आजही कुटुंब प्रमुख असल्याने त्यांना आपण उभ्या केलेल्या आमदाराला अस रडताना पाहून रहावलं नसल्यानेच त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलं असल्याची प्रतिक्रिया पंकज देशमुख यांनी दिली .
पंकज देशमुख म्हणाले की, श्रीनिवास वनगा यांच्यासंदर्भातील बातम्या पाहून उद्धव ठाकरे व्यथित झाले. उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदाराला बसवून श्रीनिवास वनगा यांना आमदार केलं. आज मनधरणीचा विषय नव्हता, उद्धव ठाकरे व्यथित झाले, आदित्य ठाकरेंना जसं वागतात त्याप्रमाणं ते शिवसैनिकांना वागवतात. उद्धव ठाकरेंनी काळजीपोटी विचारपूस करुन येण्यास सांगितलं होतं. आजचा विषय राजकारणाचा नव्हता, असंही पंकज देशमुख म्हणाले. उद्दव ठाकरेंनी कुटुंबीयांची भेट घेऊन सत्यपरिस्थिती जाणून घेण्यास सांगितलं होतं, असं पंकज देशमुख यांनी सांगितलं.
इतर बातम्या