एक्स्प्लोर

MNS Candidate List : मनसेचा धडाका सुरुच, 18 उमेदवारांची सातवी यादी जाहीर, इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिला

MNS Candidate List : राज ठाकरे यांच्या मनसेकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 18 उमेदवारांची सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणं मनसेनं आज 18 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांच्या मान्यतेनं मनसेनं उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. मनसेनं 18 उमेदवारांच्या यादीसह आतापर्यंत एकूण 135 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. 

मनसेच्या सातव्या यादीत कुणाला संधी ? 

बाळापूर - मंगेश गाडगे
मूर्तिजापूर-भिकाजी अवचर
वाशिम- गजानन वैरागडे 
हिंगणघाट- सतीश चौधरी
उमरखेड - राजेंद्र नजरधने
औरंगाबाद मध्य- सुहास दाशरथे
नांदगाव- अकबर सोनावाला 
इगतपुरी - काशिनाथ मेंगाळ 
डहाणू- विजय वाढिया
बोईसर- शैलेश भुतकडे
भिवंडी पूर्व- मनोज गुळवी
कर्जत खालापूर- जगन्नाथ पाटील
उरण- सत्यवान भगत
इंदापूर- अमोल देवकाते
पुरंदार - उमेश जगताप
 श्रीरामपूर- राजू कापसे
पारनेर- अविनाश पवार 
खानापूर - राजेश जाधव

इगतपुरीत हिरामण खोसकर यांच्या विरुद्ध काशिनाथ मेंगाळ यांना उमेदवारी 

नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघात मनसेकडून शिंदेंच्या शिवसेनेतून प्रवेश केलेल्या माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. मनसेच्या काशिनाथ मेंगाळ यांच्यामुळे युतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या समोरील आव्हान वाढणार आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून हिरामण खोसकर आणि महाविकास आघाडी कडून लकी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  मनसेने माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना उमेदवारी दिल्यामुळे इगतपुरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. मनसेकडून आयारामांना संधी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातही भाजपमधून आलेल्या दिनकर पाटलांना उमेदवारी तर इगतपुरीत शिंदे गटातून मनसेत आलेल्या काशिनाथ मेंगाळांना संधी देण्यात आली आहे.

इंदापूरमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होत आहे. अजित पवारांकडून दत्तात्रय भरणे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटील रिंगणात आहेत. इथं मनसेकडून अमोल देवकाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पारनेर विधानसभा मतदार संघात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी मनसेनं अविनाश पवार यांना उमेदवारी दिली आहे. 

अमित ठाकरे यांच्याकडून अर्ज दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, वरळी विधानसभा मतदारसंघातून देखील संदीप देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

इतर बातम्या :

MNS Candidate List : मनसेची सहावी यादी जाहीर, अशोक चव्हाणांच्या लेकीविरुद्ध उमेदवार दिला, किती जणांना उमेदवारी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM Headlines at 12PM 28 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 28 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सMohit Kamboj On Baba Siddique : सिद्दीकींच्या डायरीमध्ये कंबोज यांचं नाव? कंबोज स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines at 10AM 28 January 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Embed widget