महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज
Maharashtra Assembly Election : महायुतीच्या जागावाटपात भाजपनं मित्रपक्षांना चार जागा सोडल्या आहेत. यामध्ये जनसुराज्य पार्टी, रासप, आरपीआय आणि रवी राणांना जागा सोडण्यात आली आहे.
![महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज Maharashtra Assembly Election 2024 BJP give four seats to Ramdas Athawale Mahadev Jankar Vinay Kore and Ravi Rana Marathi News महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/28/802505526f94fe29d61f9132238ff9a81730128056281989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई :महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपनं त्यांच्या मित्रपक्षांना चार जागा सोडल्या आहेत. भाजपनं आतापर्यंत 146 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर, भाजपनं त्यांच्या कोट्यातून मित्र पक्षांना बडनेरा, शाहुवाडी, कलिना, गंगाखेड येथील जागा दिल्या आहेत. विशेष बाब म्हणजे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन देखील गंगाखेडची जागा सोडण्यात आली आहे. गंगाखेडमधून रासपकडून रत्नाकर गुट्टे रिंगणात असतील.
भाजपकडून मित्रपक्षांना चार जागा सोडण्यात आल्या आहेत. बडनेरामध्ये रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पार्टीला एक जागा सोडण्यात आली आहे. मुंबईतील कलिना विधानसभा मतदारसंघाची जागा रामदास आठवले यांच्या रिपाई आठवले गटाला देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विनय कोरे यांच्यासाठी सोडण्यात आली आहे.
महायुतीतून महादेव जानकर बाहेर पडलेले आहेत त्यांच्या रासपला गंगाखेडची जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष बाहेर पडला असला तरीही रत्नाकर गुट्टे हे जे गंगाखेडमधून विद्यमान आमदार आहेत त्यांनाच सोडण्यात आली आहे.
बडनेरा - रवी राणा
गंगाखेड - रत्नाकर गुट्टे
कलिना - अमरजीत सिंह
शाहूवाडी : विनय कोरे
रामदास आठवले यांनी कलिना विधानसभा मतदारसंघातून अमरजीत सिंह यांना मी उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरजीत सिंह उत्तर भारतीय ते आहेत, ते आमच्यासोबत राहतील असं देखील त्यांनी सांगितलं आहे. रामदास आठवलेंना एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातून धारावीची जागा देखील मिळणार आहे.
भाजपची जागा वाटपात मित्रपक्षांसह 150 पर्यंत घौडदौड
महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. भाजपनं आतापर्यंत उमेदवारांच्या नावांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपनं 146 जागांवर उमेदवार जाहीर केले असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 65 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 49 जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
महायुतीनं आतापर्यंत 264 मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. महायुतीतून अजूनही 24 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणं बाकी आहे.
भाजपच्या तीन याद्या जाहीर झाल्यानंतर अजून आणखी एक यादी येणार असल्याची माहिती आहे.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)