(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Madhurimaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
Madhurimaraje Chhatrapati : मालोजीराजे यांनी झालेल्या घटनामोडींवर अधिक भाष्य न करता विरोध करणाऱ्या माजी नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा दिला असल्याची माहिती दिली.
Kolhapur Uttar Vidhan Sabha : राज्यामध्ये जाहीर केलेले तब्बल तीन उमेदवार मागे घेण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे. कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर कोल्हापूरमध्ये माजी नगरसेवक आणि निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्यात आला आहे. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या सुविद्य पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
राजेश लाटकरांना विरोध, माजी नगरसेवकांचा लेटरबाॅम्ब
माजी आमदार मालोजीराजे यांनी आज संध्याकाळी राजवाड्यावरून मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती दिली. उद्या (29 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येनं येण्याचे आवाहन मालोजीराजे यांनी केली. मालोजीराजे यांनी झालेल्या घटनामोडींवर अधिक भाष्य न करता विरोध करणाऱ्या माजी नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा दिला असल्याची माहिती दिली.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये आज सकाळपासून कोल्हापूर उत्तरचा उमेदवार बदलणार अशी चर्चा सुरू होती. राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली होती. पहिल्यांदा काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्यात आल्यानंतर तब्बल 26 नगरसेवकांनी सतेज पाटील यांना पत्र लिहीत हा लादलेला उमेदवार असल्याचा आरोप करत उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर पक्षाचे सदस्य नसतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि निष्ठावंतांना डावलण्यात आले, असा सुद्धा आरोप केला होता.
पहिल्यांदा मधुरिमाराजेंचा निवडणूक लढण्यासाठी नकार
काही दिवसांपूर्वीच मधुरिमाराजे छत्रपती आणि माजी आमदार मालोजीराजे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती. त्याचबरोबर खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी आणखी एक उमेदवार राजघराण्यातून नको अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे काँग्रेसकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळेल असे संकेत सतेज पाटील यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र राजेश लाटकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करूनही माजी नगरसेवकांकडून होत असलेला विरोधाने मधुरिमाराजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या