Uddhav Thackeray Speech Thane : 4 जूननंतर मोदी नसतील लिहून ठेवा,ठाण्यातील भाषणात ठाकरे बरसले
Uddhav Thackeray Speech Thane : 4 जूननंतर मोदी नसतील लिहून ठेवा,ठाण्यातील भाषणात ठाकरे बरसले
हिंदू देशभक्त नाहीत का? तुम्ही नमो भक्त आहेत, हे सगळे नमो रुग्ण आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी आणि त्यांच्या समर्थकांवर निशाणा साधला. ही सडलेली पानं आहेत, झडून गेली ते बरे आहे. राजन यांचं कौतुक, तुम्हाला कोणी खोके विचारायला आले नाही, हीच दिघे सहेनाची निष्ठ आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. दिघे साहेबांचे नाव आणि फोटो लावतात पण त्यांच्या सारखे वागायला हवे असंही ठाकरे म्हणाले. मी अक्षय कुमार यांना सांगणार आहे, पंतप्रधान यांना विचारायला, की तुम्ही टरबूज कसे खाता असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.
आज मोदींना बाळासाहेबांचे नाव घेऊन प्रचार करावा लागत आहे. आमच्या 48 जागा निवडून येणार, मनगट घट्टा पाहिजे, मग सगळं जिंकू असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. तसंच 'जितेंद्र तुम्ही नोटीस फाडली, 4 जून नंतर आपण यांना फाडून टाकू, बाळासाहेबांनी 2 सभा घ्यायला सांगितल्या, एक शिवाजी पार्क आणि दुसरी ठाण्यात, ठाणे माझ्यासाठी नवीन नाही असंही ठाकरे म्हणाले.