Suresh Dhas on Beed : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते सरकारी वकील; फडणवीसांच्या भेटीनंतर सुरेश धस आक्रमक
Suresh Dhas on Beed : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते सरकारी वकील; फडणवीसांच्या भेटीनंतर सुरेश धस आक्रमक
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात बऱ्याच दिवसांनी परळीचे आमदार आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशेष म्हणजे खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या आणि सरपंच हत्याकांडाचा मास्टरमाईंड असा आरोप असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) पोलिसांनी अटक केल्यानंतर धनंजय मुंडेंची प्रथमच आपली बाजू मांडली आहे. तत्पूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चाही देखील केली. या बैठकीतील चर्चा गुलदस्त्यात आहे, मात्र मुंडेंनी बीड हत्याप्रकरण व वाल्मिक कराडवर आपली भूमिका मांडली. तर, वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो, यावरही धनजंय मुंडेंनी स्पष्टीकरण देत विजय वडेट्टीवार हे बोलण्यात हुशार असल्याचं त्यांनी म्हटलं.
मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा, विजय वडेट्टीवारांचे वक्तव्य, वाल्मिक मुंडे, राजीनामा आणि हत्याप्रकरणाच्या तपासावरही भाष्य केलं. बीडची घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी हीच सगळ्यांची भूमिका आहे. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही, कुणाचाही राजीनामा मागायचा सध्या असं चाललंय असे धनंजय मुंडेंनी म्हटलं. तसेच, आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री करा अशी मागणी केली आहे. त्यासंदर्भात बोलताना मुंडे म्हणाले की, बिनखात्याचं मत्री कसं करता येतं हे शासनाने त्यांच्याकडून संपूर्ण माहिती करुन घ्यावं. बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय असेल तो आमचे नेते अजित दादा घेतील, असेही मुंडेंनी म्हटले.