(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत ,आणखी तीन अभिनेत्री सुकेशच्या निशाण्यावर
गेल्या काही दिवसांपासून तिहार कारागृहात अटकेत असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीसह आणखी तीन अभिनेत्री सुकेशच्या निशाण्यावर होत्या अशी माहिती ईडीच्या तपासातून समोर आलीय. सुकेशने अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधत त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आलीय. पिंकी इराणीच्या माध्यमातून सुकेशने या तिघींशी संपर्क साधल्याचं समोर येतंय. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. काही अभिनेत्रींनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला तर काहींनी नाकारल्या होत्या. सारा, जान्हवी आणि भूमीला भेटवस्तू पाठवण्यासाठी सुकेशने खंडणीतून मिळालेल्या पैशांचा वापर केल्याचा आरोप आहे. सुकेशने सूरज रेड्डी नावाने मेसेज करत महागडी कार देणार असल्याचे साराला सांगितलं.